Cash For Job Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: तीन वर्षांत गोमंतकीयांना सुमारे 4.52 कोटींचा गंडा, 40 पैकी 26 प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

Goa Assembly Winter Session: गेल्‍या तीन वर्षांत सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍यासाठी (कॅश फॉर जॉब) लोकांची फसवणूक करण्‍यासंदर्भातील एकूण ४० प्रकरणे राज्‍यात घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्‍या तीन वर्षांत सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍यासाठी (कॅश फॉर जॉब) लोकांची फसवणूक करण्‍यासंदर्भातील एकूण ४० प्रकरणे राज्‍यात घडलेली असून, त्‍यात नागरिकांची सुमारे ४.५२ कोटींची फसवणूक झाल्‍याचे मुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता. गेल्‍या तीन वर्षांत राज्‍यात ‘कॅश फॉर जॉब’ची किती प्रकरणे घडली? त्‍यात नागरिकांची किती रुपयांची फसवणूक झाली? संशयितांवर काय कारवाई झाली? यात राजकारण्‍यांचा समावेश असल्‍याचे समोर आलेले आहे का? आणि या प्रकरणात आरोपी असलेल्‍या पूजा नाईक हिची नार्को चाचणी करण्‍यात येणार आहे का? असे प्रश्‍‍न आलेमाव यांनी विचारले होते.

त्‍यावर २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्‍या कालावधीत राज्‍यात ‘कॅश फॉर जॉब’ची एकूण ४० प्रकरणे घडली. त्‍यातील २६ प्रकरणांत आरोपपत्रे दाखल करण्‍यात आली आहेत. तर, दहा प्रकरणांतील संशयित आरोपींना अटक करण्‍यात आल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

एक अर्ज सादर

‘कॅश फॉर जॉब’मध्‍ये आतापर्यंत राजकारणी सहभागी असल्‍याचे समोर आलेले आहे. या प्रकरणातील आरोपी पूजा नाईक हिची नार्को चाचणी करण्‍यासंदर्भातील एक अर्ज न्‍यायालयात सादर झालेला आहे, असेही मुख्‍यमंत्र्यांनी उत्तरातून स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: "न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या नावाखाली सरकारची पळवाट"- विरोधी पक्षनेते

Mohammed Siraj Appointed Captain: सिराज आता 'कॅप्टन कूल'च्या भूमिकेत; हैदराबाद संघाचं करणार नेतृत्व!

जमिनीच्या वादांना बसणार पूर्णविराम? 'नक्शा' प्रकल्पाद्वारे प्रत्येक मालमत्तेला मिळणार युनिक डिजिटल आयडी

'मराठी माणूस' फॅक्टर ठरणार गेमचेंजर! भाजपच्या 'डबल इंजिन'ला 'ठाकरे बंधूं'चं तगडं आव्हान- संपादकीय

Surya Gochar 2026: 15 जानेवारीपासून नशीब पालटणार! 'या' 4 राशींच्या नशिबात सुवर्णकाळ; पुढील 30 दिवस होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT