Goa Carnival Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival Festival 2022: रोषणाईने नटली पणजी

पणजीतील वाहतुकीत कार्निव्हलनिमित्त बदल

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणाऱ्या किंक मोमोची राजवट उद्यापासून पणजीत अवतरणार असून यासाठी राजधानी सज्ज झाली आहे. पुढील चार दिवस या राजाची राजवट राज्यावर असेल. कार्निव्हलसाठी विविध मुखवट्यांनी, रंगबिरंगी पताका तसेच विद्युत रोषणाईने पणजी नटली आहे.

यंदाच्या कार्निव्हलचे महत्वाचे आकर्षण म्हणजे महानगरपालिकेतर्फे ‘मिशन टू झिरो वेस्ट’ हा उपक्रम कार्निव्हल महोत्सवा दरम्यान राबविण्यात येणार आहे. या महोत्सवात स्थानिक संगीत, खाद्यपदार्थ तसेच स्थानिक पेयांची रेलचेल असेल. याचा आनंद स्थानिक प्रजेसह देश - विदेशातून आलेल्या पर्यटकांना लुटायला मिळणार आहे.

अटल सेतू पुलाखालून उद्या दुपारी 3 वाजता कार्निव्हल मिरवणुकीला सुरवात होणार असून आदिलशहा पॅलेससमोर किंग मोमो आपल्या राजवटीची जाहीर घोषणा करेल व कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ होईल. दुपारी 4 वाजता ओर्ता गार्डनमधील ‘सांबा स्केअर’मधील संगीत महोत्सवाला सुरवात होणार आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठीच्या कार्निव्हलचेही आयोजन करण्यात आले आहे.

या गार्डनमध्ये हस्तकला वस्तूंचे प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे. जेणेकरून स्थानिकांना त्यांच्या वस्तू तेथे विकता येतील. संध्याकाळी 4.30 वाजता मनोरंजन सोसायटीसमोरील मांडवी तिरावर ‘फुड प्रिनर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 7 वाजता कोकणी रेंपर बोंगिसियो यांचा संगीताचा कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्निव्हल महोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. दिवजा सर्कल ते कला अकादमी हा चित्ररथ मिरवणुकीचा मुख्य मार्ग आहे. मिरवणुकीत सहभागी होणारे चित्ररथ दिवजा सर्कल ते रायबंदर मेरेशी जंक्शन येथे एकत्र येतील. त्यामुळे दुपारी 12 ते संध्याकाळी मिरवणूक संपेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. दोन वाजल्यानंतर चित्ररथांना मिरवणूक मार्गावर येण्‍यास परवानगी असेल.

कुठल्याही चित्ररथाला रूआ दि ओरेम मार्गावरून येण्यास परवानगी नसेल. पणजीत येणारी वाहने ही कला अकादमी जंक्शन येथून पाटो पूल - जुआव कास्त्रो रोड - चर्च स्क्वेअर या मार्गाने येऊ शकतात. मांडवी पुलावरून तसेच बांबोळी मार्ग येणारी वाहने कोकणी अकादमी जंक्शनमार्गे जुन्या पाटो पुलावरून येतील. मिरवणुकीला सुरवात झाल्यानंतर शहरातील बसगाड्या मिरवणूक मार्गावरून चालविण्यास बंदी असेल. शहराबाहेर जाणाऱ्या गाड्यांनी कांपाल गणेश मंदिर जंक्शनमार्गे अग्निशमन दल कार्यालय, सांतइनेज जंक्शन, शहर अंतर्गत रस्त्यावरून जुन्या पोर्तुगीज पुलावरून बाहेर जाता येईल किंवा दोनापावला - गोवा विद्यापीठ मार्गानेही जाऊ शकतात.

पार्किंग विभाग

कार्निव्हलसाठी उत्तर गोव्यातून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी कंदब बस स्थानकाजवळील ईडीसी प्लाझा येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे, तर दक्षिण गोव्यातून येणाऱ्या वाहनांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून गोवा विद्यापीठ मार्गाने येऊन कांपाल मैदानावर वाहने उभी करून ठेवता येतील. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक पोलिसांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

SCROLL FOR NEXT