Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: कोलवाळ पुलावर कार जळाली, आगीचे कारण अस्पष्ट

Goa Fire: सुदैवाने या गाडीमधील चौघे पर्यटक बचावले

Ganeshprasad Gogate

Goa Fire: गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील धावत्या चारचाकी गाडीला सोमवारी रात्री 9.48 च्या सुमारास आग लागली.

ही घटना कोलवाळ पुलावर घडली. सुदैवाने या गाडीमधील चौघे पर्यटक बचावले.

या गाडीच्या (एमएच 20 सीएल 3905) बोनेटमधून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या एका बाजूला घेतली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

मात्र जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत गाडीने पेट घेतला आणि कार पूर्णतः जळाली होती. या आगीत कार मालकाचे 12 लाखाचे नुकसान झाले. ही कार प्रणव भालेराव यांच्या मालकीची होती.

हे चारही पर्यटक मूळ आंध्रप्रदेश मधील असून नोकरी निमित्त ते पुण्यात वास्तव्यास असतात. ते पुण्याहून गोव्यात पर्यनासाठी आले असता, माघारी जाताना ही दुर्घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT