Captain of Ports Goa new terminal building inauguration Dainik Gomantak
गोवा

बंदर कप्तानच्या टर्मिनलचे सोमवारी उद्‍घाटन, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा

Captain of Ports Goa new terminal building inauguration: मांडवी नदीच्या किनाऱ्यालगत उभारलेल्या ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्‌स’च्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन सोमवार, ८ रोजी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मांडवी नदीच्या किनाऱ्यालगत उभारलेल्या ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्‌स’च्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन सोमवार, ८ रोजी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार आहे.

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे उभारलेली ही नदीकाठची वास्तू तळमजला अधिक तीन मजले अशा स्वरूपाची आधुनिक प्रशासकीय इमारत आहे. तिची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशा जहाजाच्या आकाराची आहे.

४८.८७ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ ४,४०५ चौरस मीटर इतके आहे. या टर्मिनलमुळे ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्‌स’ विभागाच्या देखरेख आणि नौकानयन नियंत्रण कार्याला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

काही दिवसांपूर्वीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ८ जूनला या इमारतीचे उद्‍घाटन होईल, अशी शक्यता वर्तविली होती. या इमारतीच्या उभारणीसाठीची प्रक्रिया २०१५ पासून सुरू झाली होती. त्यात अनेक परवानग्या या इमारतीसाठी घेण्यात आल्या आहेत.

पर्यटकांना आकर्षित करणारी इमारत

या टर्मिनलच्या इमारतीत बंदर कप्तान खात्याचे कार्यालय स्थलांतरित होणार आहे. पोर्तुगीजकालीन इमारतीत अनेक वर्षे असलेल्या या कार्यालयास आता स्वतःची इमारत प्राप्त झाली आहे. जहाजाच्या आकाराची ही इमारत पर्यटकांना आकर्षित करणारी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT