केपे: बंदर कप्तान खात्याने आज कुडचडे येथे जुवारी नदीच्या फाट्यात बेकायदेशीर रेतीवर कारवाई केली. यावेळी बेकायदेशीर रेती काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या व सक्शन पंप जप्तसाठी मोहीम राबवली गेली. यामध्ये एक होडी व एक पंप पाण्यातून बाहेर काढण्यास यश मिळाले आहे.
(Goa Captain of Ports Department action on illegal sand extraction at curchorem)
मिळालेल्या माहितीनुसार फाट्यात आणखी होड्या व सक्शन पंप असल्याची माहिती बंदर कप्तान खात्याकडे असल्याने दि. 8 रोजी ही मोहीम सकाळी परत एकदा सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बाणसाय कुडचडे येथे दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री बेकायदेशीर रेती आणण्यासाठी बोट घेऊन गेलेल्या तीन कामगारांवर बंदुकीची गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला होता. यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक कामगार गंभीर जखमी झाला होता.
कामगार हल्ला प्रकरणाने कुडचडेत बेकायदेशीर रेती व्यवसायाविरुद्ध कडक कारवाई करून जुवारी नदी फाट्यात रेती काढण्यासाठी वापरण्यात येणारी होडी व सक्शन पंप पोलिसांनी जप्त केले होते. या होड्या व सक्शन पंप जप्तीसाठी बंदर कप्तान खात्याचे अधिकारी आपल्या फौजफाट्यासह हजर झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.