Goa Shipyard: गोवा शिपयार्डकडून नियमांचे उल्लंघन सुरूच - नंदादीप राऊत

''गोवा शिपयार्डने राष्ट्रीय महामार्ग नियम धाब्यावर बसविले''
Goa Shipyard
Goa Shipyard Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा शिपयार्ड कंपनीने मुरगाव पालिकेसह राष्ट्रीय महामार्ग (17 बी)नियमांचे उल्लघन करीत दोन मुख्य गेटवर पत्र्यांचे आच्छादन बसविले आहे. तसेच या कंपनीचे कामगार आपली वाहने राष्ट्रीय महामार्गावर पार्क करून जातात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो. म्हणून संबंधीत विभागावर कारवाई करण्याची मागणी मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केली.

(Nandadeep Raut allegation on goa shipyard company vasco)

Goa Shipyard
Goa Crime: आंबेघाट येथे सापडलेला सांगाडा गरोदर महिलेचा

वास्को गोवा शिपयार्ड कंपनीने राज्य सरकारच्या नियमांचे उल्लघन करण्याचे षडयंत्र सुरूच ठेवले आहे. गोवा शिपयार्ड कंपनीने आपली मनमानी करताना राज्य सरकारची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गापर्यन्त पत्र्याचे अच्छादान बसविले आहे. तसेच कंपनीत येणारे कामगार आपली दुचाकी, चारचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावर पार्क करून कंपनीत कामाला जातात. यामुळे वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते.

Goa Shipyard
National Highway 17A: बेकायदेशीर टॅक्सी पार्किंगवर पोलिसांची धडक कारवाई

माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी वास्को वाहतुक पोलिसांबरोबर मुरगाव तालुका सहाय्यक वाहतुक संचालकांनी बेकायदेशीर वाहने पार्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली. याप्रकरणी वरील दोन्ही वाहतुक विभागांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडे याची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राऊत यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com