Goa Court Dainik Gomantak
गोवा

Candolim Murder Case: सूचनाच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

Candolim Murder Case: या हत्या प्रकरणानंतर गोवा हे पर्यटनसोबतच गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

Ganeshprasad Gogate

Candolim Murder Case:

महिनाभरापासून राज्यासह देशाला हादरवून टाकणाऱ्या कांदोळी येथील हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सूचना सेठ हिच्या न्यायालयीन कोठडीत पणजी बाल न्यायालयाने आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे.

आपल्याच मुलाच्या खून प्रकरणात संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या सूचना सेठला सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

आणि त्यानंतर पणजी बाल न्यायालयाने सूचनाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता पुन्हा न्यायालयाने सूचनाच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

काही दिवसनपूर्वी बेंगळुरू येथील स्थानिक न्यायालयात सूचनाने आपल्या पतीविरोधात दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची सुनावणी झाली.

मात्र सूचना सध्या गोव्यात कोठडीत असल्याने तिने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ती हजर न राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

याचिकाकर्त्याने पुरावे उपलब्ध करून देण्याच्या स्थितीत असलेल्या खटल्याची सुनावणी बेंगळुरू न्यायालयाने तहकूब केलीय.

या घटनेमुळे राज्यासह देशात मोठी खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणानंतर गोवा हे पर्यटनसोबतच गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र हॉटेल स्टाफच्या आणि गोवा पोलिसांच्या सतर्कपणामुळे संशयित सूचना कायद्याच्या कचाट्यात सापडली.

14 दिवसांची कोठडी पूर्ण झाल्यावर न्यायालय या प्रकरणाविषयी कोणता निर्णय देते हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

Narendra Modi Journey: 7 ऑक्टोबर 2001 ते मोदी पर्वाची 25 वर्षे; गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास, विकासाच्या दाव्यांपासून रोजगार-लोकशाहीवरील प्रश्नांपर्यंत

DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगारात झाली घसघशीत वाढ; 'या' सरकारनं दिलं मोठं गिफ्ट

October Heat: 34 अंश तापमान, पण अंगाला जाणवतोय 43 अंशांचा चटका! गोव्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याची तीव्रता वाढली

SIR Voter List Case: 'सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे' म्हणत ECIची स्थगितीची मागणी; गोवा खंडपीठाचा नकार, 'दोन्ही प्रकरणांतील कायदेशीर मुद्दे वेगळे'

SCROLL FOR NEXT