Tourist Death Dainik Gomantak
गोवा

Tourist Death: कांदोळीत बनाना राईड ठरली जीवघेणी; उत्तर प्रदेशातील 54 वर्षीय पर्यटकाचा बुडून मृत्यू

Goa Tourist Death: कांदोळी येथील समुद्रकिनारी बनाना फ्लोटर राईडदरम्यान पाण्यात पडल्यामुळे यशपाल नंदवानी या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कांदोळी येथील समुद्रकिनारी बनाना फ्लोटर राईडदरम्यान पाण्यात पडल्यामुळे यशपाल नंदवानी (वय ५४, रा. उत्तर प्रदेश) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सायंकाळी ४.१० च्या सुमारास एलरो शॅकसमोरील समुद्रात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदवानी कुटुंबीय गोव्यात पर्यटनासाठी आले होते. एका वॉटर स्पोर्टस संस्थेमार्फत ते बनाना राईडचा आनंद घेत होते. किनाऱ्याजवळ ऑपरेटरने फ्लोटर बोट उलटवण्याचा प्रयत्न केला. यात यशपाल पाण्यात पडल्याने त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेले आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच जीवरक्षक आणि पर्यटक पोलिसांनी धाव घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, नाका-तोंडात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यामुळे त्यांना तातडीने कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: सूर्याचे नक्षत्र आणि राशी परिवर्तन ठरणार गेमचेंजर! डिसेंबरमध्ये 'या' 5 राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार मोठं यश अन् पैसा

Fake Medicine Case: बनावट औषध प्रकरणात डॉक्टरांना कोर्टाचा दणका; फेरतपासणीचा अर्ज 10 महिन्यांनंतर फेटाळला

उपचार करून त्याला पूर्णपणे बरं करण्यात येईल... विनोद कांबळींच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे; उपचाराचा खर्च अन् मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलणार

Majhe App: तिकीट बुकिंगपासून रिक्षा सेवांपर्यंत; गोव्यात 'माझे ॲप' सुरू, 600 बसेसचे लोकेशन पाहता येणार

Marathi Rajbhasha: मराठी राजभाषेच्या मागणीसाठी रथयात्रा; 6 डिसेंबरला म्हापशात जाहीर सभा

SCROLL FOR NEXT