

फोंडा: गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे आयोजित रथयात्रेला आज शनिवारी ढवळी-फोंडा येथील सत्यनारायण देवस्थानाजवळून दिमाखात प्रारंभ झाला. यावेळी मराठीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत मराठी राजभाषेच्या मागणीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
रथयात्रेच्या प्रारंभी सत्यनारायण देवाला गाऱ्हाणे घालून देवाचे आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर रथयात्रेला सुरुवात झाली. मराठी राजभाषेच्या मागणीसाठी गावोगावी जागर सुरू झाला आहे. यावेळी समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, शाणूदास सावंत, जयंत मिरिंगकर, मच्छिंद्र च्यारी, जयवंत आडपईकर, अनिता तिळवे, हनुमंत नाईक, प्रदीप बखले यांच्यासह अनेक ज्येष्ठ मराठीप्रेमी, युवक आणि युवती उपस्थित होते.
६ डिसेंबरला म्हापसा येथे मराठीच्या समर्थनार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी राजभाषेच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन गो. रा. ढवळीकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.