Bank Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Bank Fraud: कर्जासाठी मालमत्ता गहाण मात्र 'अशाप्रकारे' केलीय बँकेची 9 कोटींची फसवणूक; बेतकी-खांडोळा येथील प्रकार उघड

‘शांती ॲग्रो’च्या भागीदारांवर गुन्हा

गोमन्तक डिजिटल टीम

Bank Fraud कर्जासाठी बँकेकडे गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता कटकारस्थान रचून तिची परस्पर विक्री करून बँकेची 9.37 कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षेच्या पोलिसांनी बेतकी-खांडोळा येथील मे. शांती ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे चार भागीदार तसेच खरेदीदार मिळून पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेच्या एआरएम शाखेचे व्यवस्थापक तथा ॲटर्नी नागेश्‍वर बिक्शपथी यांनी या कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

पोलिसांनी फसवणूक, कट-कारस्थानच्या आरोपाखाली संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती या कक्षेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मे. शांती इंडस्ट्रीज कंपनीचे भागीदार असलेल्या संशयित शांती सुरेंद्र कामथ, अर्बेतू सुरेंद्र कामथ, आशिष सुरेंद्र कामथ, मैत्री सुरेंद्र कामथ आणि भानुदास वझे यांचा समावेश आहे.

शांती आणि अर्बेत हे कंपनीचे संचालक आहेत, तर आशिष कामथ, मैत्री कामथ हे भागीदार आहेत. भानुदास याने कामथ यांच्याकडून बँकेकडे गहाण असलेली मालमत्ता खरेदी केली आहे.

ही मालमत्ता बँकेकडे तारण असल्याची माहिती खरेदीदाराला असूनही त्याने ती खरेदी केली. त्यासंदर्भातील नोंदणी फोंडा निबंधकांकडे केली आहे. त्यामुळे संशयितांनी बँकेचा विश्‍वासघात करत फसवणूक केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

SCROLL FOR NEXT