Goa Government | Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: काणकोणला ‘टुरिझम मॉडेल’ बनवण्यास वाव!

Rohan Khaunte: स्वदेश पर्यटन योजनेंतर्गत तालुक्याचा करणार विकास

दैनिक गोमन्तक

Rohan Khaunte: पंतप्रधानांच्या स्वदेश पर्यटन योजने अंतर्गत काणकोण मधील विविध पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील.त्याद्वारे काणकोण तालुक्याचा ‘टुरिझम मॉडेल’ म्हणून विकास करण्यास वाव आहे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. साधल्यानंतर सांगितले.

काणकोण दौऱ्यावेळी आज श्रीस्थळ येथील विश्रामगृहात पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते. काणकोण आगोंद,पाळोळे हे किनारे जगाच्या पर्यटन नकाशावर आहेत.

किनारी पर्यटन विकसीत करून कृषी,स्वास्थ्य,साहसी, धार्मिक स्थळे व अन्य पर्यटन क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यटन खाते काणकोण तालुक्याकडे त्या दृष्टीकोनातून बघत असल्याचे पर्यटन मंत्री खंवटे यांनी सांगितले.

सध्या कोरोना काळानंतर रिव्हेंज टुरिझम, ॲग्रो टुरिझमला चांगले दिवस आले आहेत. मोपा चालू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ चालूच राहणार आहे, मात्र पर्यटकांना आमच्या बेशिस्तीमुळे आम्ही त्यांना मालवणमध्ये पाठवणार, की दक्षिण गोव्यात आकर्षित करणार हे पर्यटन व्यावसायिकांनी ठरवणे गरजेचे आहे, असेही खंवटे म्हणाले.

राज्यातील पर्यटन गाव म्हणून विकसीत करण्यात येणाऱ्या पाच गावांमध्ये खोतीगावचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले, की पर्यटन व्यावसायिकांनी व्यवसाय करताना आपण एक समाजाचा भाग असल्याचे भान ठेवावे. समाजाच्या उत्थानासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. भाजपचे राज्य सरचिटणीस सर्वानंद भगत यांनी तालुक्यात धार्मिक पर्यटनाला वाव देण्याची गरज व्यक्त केली.

खोतीगावचे सरपंच आनंदु देसाई यांनी पंचायत क्षेत्रातील कुस्के धबधबा, श्री मल्लिकार्जुन देवालय, आवळी, बड्डे येथील डोंगर माथा व धार्मिक स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मागणी केली. यावेळी विशांत गावकर, प्रभाकर गावकर यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या.

लोलये चौपाटीचा विकास व्हावा !

लोलयेचे सरपंच सचिन नाईक यांनी पोळे येथे स्वागत कक्ष उभारण्याची तसेच चौपाटीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मागणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी यांनी बॅक वॉटर पर्यटन व्यवसाय पाळोळेत सुरू करण्यास वाव असल्याचे सांगितले.

समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी प्रयत्नशील

काणकोण मधील दोन किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळविण्याचा प्रयत्न खाते करीत आहे. त्यासाठी पर्यटन व्यावसायिक, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामस्थ यांचे सहकार्य अपेक्षित आहे हे मानांकन डेन्मार्क येथील एक संस्था स्वंतत्रपणे देते.

त्यासाठी सांडपाणी निचरा,पेयजल, स्वच्छता, रस्ते असे विविध ३८ निकष आहेत. ते निकष तपासूनच उच्चभ्रू पर्यटक संबंधित किनाऱ्याला भेटी देत असतात, असे पर्यटन संचालक निखिल देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

Goa Live News: 56th IFFI ईफ्फीत दिसलो सनी देवोलाचो हमशकल; Watch Video

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT