Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Canacona Raid: घरात चालायचा 'जुगार' अड्डा! कर्नाटकातील 40 संशयितांच्या मुसक्या आवळल्या; काणकोणात 16 लाखांचा ऐवज जप्‍त

Loliem Polem Gambling Raid: काणकोण पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, अटक केलेल्‍यांमध्‍ये रॉनी फर्नांडिस (वय २९ वर्षे) हा पोळे येथील स्‍थानिक युवक असून सर्व संशयित हे कर्नाटक राज्‍यातील आहेत.

Sameer Panditrao

मडगाव/काणकोण: राज्‍यात जुगार खेळण्‍याचे प्रमाण वाढले असतानाच आज पहाटे काणकाेण पोलिसांनी लोलये-पोळे येथे एका घरात चालविल्या जाणाऱ्या जुगारी अड्ड्यावर छापा टाकून जुगार चालविणाऱ्या सातजणांसोबत तब्‍बल ४० जणांच्या मुसक्या आवळल्या. यातील बहुतेक संशयित हे कारवार व अंकोला या भागातील असून कारवारहून मोठ्या प्रमाणात लोक काणकोणातील अड्ड्यावर येऊन जुगार खेळत असल्‍याचे उघड झाले आहे.

काणकोण पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, अटक केलेल्‍यांमध्‍ये रॉनी फर्नांडिस (वय २९ वर्षे) हा पोळे येथील स्‍थानिक युवक असून सर्व संशयित हे कर्नाटक राज्‍यातील आहेत. दुलगळी-लोलये येथील तेल्‍मा नावाच्‍या महिलेचे घर भाड्याने घेऊन त्‍याचे जुगारी अड्ड्यात रूपांतर केले होते, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

या कारवाईत पोलिसांनी ५.२० लाख रुपये रोख, ५ लाख रुपये किमतीचे ४० मोबाईल, ६ लाख रुपयांची कर्नाटक नोंद असलेली इर्टीगा कार तसेच १ काॅम्‍प्‍युटर मॉनिटर असा एकूण १६.३५ लाखांचा ऐवज जप्‍त केला.

काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिश राऊत देसाई यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, मंगळवारी मध्यरात्री २ वाजता त्‍यांना एका इसमाकडून फोन आला.

लोलये येथील घरात जुगार चालत असून कर्नाटकातून बरेच लोक तिथे पत्‍त्‍यांचा जुगार खेळण्‍यासाठी आल्‍याची माहिती त्‍या इसमाने दिल्‍यानंतर काणकोण पोलिसांचे पथक या ठिकाणी पाठविले असता, पहाटे उशिरापर्यंत तिथे पत्‍त्‍यांचा जुगार जोरात सुरू होता, असे दिसून आले. या घरातील सर्वांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. पहाटे सव्‍वातीन वाजता सुरू झालेली ही कारवाई सकाळी ६.३० वाजेपर्यंत चालू होती. सकाळी ९.४५ वाजता याप्रकरणी रितसर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला.

मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, यापूर्वी हा अड्डा काणकोणातील राष्‍ट्रीय महामार्गाजवळ चालत होता. महिन्‍याभरापूर्वी तो लाेलयेत हलविला. येथे जुगार खेळायला येणारे बहुतेक लोक शेजारच्‍या कर्नाटक राज्‍यातून यायचे. यासंबंधी निरीक्षक राऊत देसाई यांना विचारले असता, काही दिवसांपासून आम्‍ही या जुगाऱ्यांच्‍या मागावर होतो.

मात्र, हा अड्डा नेमका कुठे सुरू आहे, याची माहिती पोलिसांना मिळत नव्‍हती. आज ही माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला.

ही कारवाई करणाऱ्या पथकामध्‍ये पोलीस उपनिरीक्षक अजित वेळीप, उपनिरीक्षक रामदास दहीफोडे, हवालदार नंदकुमार गोसावी, पोलिस शिपाई रोहन नाईक, सोमेश फळदेसाई, भूषण फळदेसाई, रक्षक देविदास, रोहन देविदास, रूपेश सतरकर, दीपक पागी आणि शिवानंद पागी यांचा समावेश होता. दक्षिण गोव्‍याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्‍याचे निरीक्षक देसाई ‍यांनी सांगितले.

अड्डा चालविणारे बहुतांश कर्नाटकातील

हा अड्डा चालविणाऱ्यांमध्‍ये महेंद्र दयानंद नाईक (वय ५०, रा. कुमठा), प्रशांत नाईक (वय ३०, रा. अवरसा), आनंद नायक (वय ४०, रा. कुमठा), पूर्णेश कृष्‍णप्‍पा (वय ४०, रा. शिमाेगा), सुधाकर नाईक (वय ४३, रा. कुमठा), नागराज नाईक (वय ३८, रा. अंकोला) आणि रॉनी फर्नांडिस (वय २९, शेळी-काणकाेण) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT