Shripad Vader Swami| Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: काणकोण पर्यटन प्रकल्पास पूर्ण सहकार्य

Goa Tourism News: श्रीपाद वडेर स्वामी : रोहन खंवटेंनी घेतली सदिच्छा भेट

दैनिक गोमन्तक

Goa Tourism News: काणकोण सारख्या गोव्याच्या दक्षिणेकडील तालुक्यात आध्यात्मिक पर्यटनाला भरपूर वाव असून राज्य सरकारच्या अशा एखाद्या पर्यटनाभिमुख प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे स्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना दिले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच पर्यटन विकासाच्या हेतूने तेथील महत्त्वाच्या स्थळांची माहिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी केलेल्या काणकोण दौऱ्यावेळी पर्तगाळ येथील मठाला सदिच्छा भेट देऊन स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी स्वामीजींनी राज्य सरकारच्या विकास प्रयत्नांना सहकार्य करू, असे सांगितले.

पर्तगाळ येथील मठात विविध धार्मिक कार्यक्रम सातत्याने होत असतात. या मठाला महान गुरू परंपरा लाभली असून सदोदित येथे आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे एखादा आध्यात्मिक पर्यटन प्रकल्प या तालुक्यात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्यास त्याचे स्वागत असेल असे स्वामीजींनी स्पष्ट केले. त्यासाठी जी काय मदत हवी असेल, त्यासाठी अवश्य हाक द्या, असे त्यांनी पुढे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT