Tawadkar meets Union Minister Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Canacona : काणकोणात होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; तवडकरांच्या भेटीनंतर गडकरींचा होकार

सभापती रमेश तवडकर यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona : काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सभापती तवडकर व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात विविध प्रकल्पाच्या विषयांवर चर्चा झाली.

यावेळी त्यांच्यासोबत काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, शंभा नाईक देसाई हे उपस्थित होते. प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी गडकरींनी उपस्थितांना दिले.

सभापती रमेश तवडकर यांनी आज केंद्रीय मंत्री गडकरी यांची दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने काणकोण-कारवार बायपास रोडवरील चार रस्ता येथील स्व. मनोहर पर्रीकर बगल मार्गाच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव सादर केला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी पुतळा उभारण्यासंबंधी सहमती दर्शवली.

बेंदूर्डे ते काणकोण पर्यंत 14 किलोमीटर लांबीच्या एनएच 66च्या रस्त्याच्या कामाकरिता जमीन संपादन करण्याकरता 77 कोटी रुपये मंजूर करा अशी विनंती सभापती तवडकर यांनी केली. यावर केंद्रीय मंत्र्यांनी ही प्रक्रिया जलद गतीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT