Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Goa News: गृहनिर्माण मंडळाने भूखंड वाटप करावे; ढवळीकरांची सूचना!

Goa News: काणकोणमध्ये गृहनिर्माण मंडळाचे भूखंड गेली पंचवीस वर्षे पडून आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: काणकोणमध्ये गृहनिर्माण मंडळाचे भूखंड गेली पंचवीस वर्षे पडून आहेत. भाटपाल व श्रीस्थळ अशा दोन जागी मंडळाचे भूखंड आहेत. हे भूखंड मागणीप्रमाणे त्वरित वितरित करण्याची सूचना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना केली.

माजी मंत्री वासू गावकर यांच्या कारकिर्दीत श्रीस्थळ येथील जमीन मंडळाने संपादित केली होती. त्यावेळी काहींनी रक्कम भरून या जमिनीतील भूखंड आरक्षित केले होते. मात्र मागणी करूनही मंडळाने अद्याप भूखंड वितरित केले नाहीत, मध्यंतरी मंडळाने भूखंडाचे प्रति चौरस मीटर दर वाढवले.

भाटपाल येथे मंडळाची 56550 चौरस मीटर जागा असून त्यात 84 भूखंड आहेत, तर श्रीस्थळ येथे 80100 चौरस मीटर जमिनीत 89 भूखंड आहेत. त्यापैकी 23 भूखंडाची लिलावाद्वारे विक्री करण्यात आली आहे. मंडळाचा भूखंडाचा दर 4700 रुपये प्रति चौरस मीटर होता. मात्र बोलीदारांनी 8800 रुपयांपर्यंत वाढवून भूखंड खरेदी केले.

भाटपाल येथील जमिनीचे सीमांकन वादात सापडले आहे, असे मंडळाचे अधिकारी विश्वास गावडे यांनी मंत्र्याच्या नजरेस आणून दिले. यावेळी मंत्र्यांनी वादग्रस्त जमीन सोडून राहिलेल्या भूखंडाचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली.

शनिवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काणकोणात आल्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या श्रीस्थळ विश्राम धामात घेतलेल्या बैठकीत ही सूचना केली.यावेळी सभापती रमेश तवडकर उपस्थित होते.

गृहनिर्माण मंडळाचे भूखंड मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी यांना देऊ नका. ज्यांना गरज आहे, त्यांना हे भूखंड मिळायला हवे. तसेच शैक्षणिक संस्था, इस्पितळे सामाजिक संस्थांनी मागणी केल्यास त्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे हे भूखंड द्यायला हरकत नाही, ते त्यांना द्यावे असे निर्देश मंत्री ढवळीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मंत्री, आमदारांना भूखंड नको

सभापती तथा आमदार रमेश तवडकर यांच्या बलराम शिक्षण संस्थेने श्रीस्थळ येथे दोन भूखंडाची मागणी मंडळाकडे केली आहे. त्याचप्रमाणे लोकविश्वास प्रतिष्ठानच्या मोखर्ड येथील खास मुलांच्या शाळेनेही भूखंडाची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT