Goa Train Dainik Gomantak
गोवा

Goa Train: एक्स्प्रेस रेल्वे गाड्या काणकोणात थांबवा!

Goa Train: सभापती रमेश तवडकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Train: काणकोण रेल्वे स्थानकावर एकही एक्स्प्रेस रेल्वे गाडी थांबा घेत नसल्याने येथील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मडगाव किंवा कारवार स्थानकावर जावे लागते. त्यासाठी एक्स्प्रेस रेल्वे गाड्या येथे थांबविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी नेत्रावती एक्स्प्रेस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या या रेल्वे स्थानकावर थांबा घेत होत्या.

त्याचप्रमाणे मंगला एक्स्प्रेस आणि मंगळुरू ते छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्यांचा थांबा काणकोण रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी करणे गरजेचे आहे. यापूर्वी दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुरलीधर राणे यांनी या एक्स्प्रेस गाड्यांना कणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी प्रयत्न केले होते.

त्यांच्या प्रयत्नांमुळे चार गाड्या येथे थांबा घेत होत्या. मात्र, कोविड महामारीदरम्यान या गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला. तो पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एक निवेदन सभापती रमेश तवडकर यांना देण्यात आले आहे.

वर्दळ वाढली

काणकाेण तालुक्यातून रेल्वेने प्रवास करणार्यांची संख्या बरीच वाढली आहे. या मार्गावरून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या जात असल्याने त्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देणे आवश्‍यक आहे. आता येथील प्रवाशांनी सभापती रमेश तवडकर यांना साकडे घातले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT