Goa Agriculture | Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: शेतकऱ्यांना स्वयंभू बनविण्यासाठी युवकांनी पुढे यावे- रमेश तवडकर

Goa Agriculture: मतदारसंघातील लोकांनी आणि विशेषतः युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: काणकोण व्हीजन आणि मिशनद्वारे काणकोणसाठी आपण एक सक्षम कृषी संकल्पना तयार करून त्याद्वारे या भागातील प्रत्येक शेतकरी कसे स्वयंभू होऊ शकतील. यासाठी कृषी संचालनालय तसेच या मतदारसंघातील लोकांनी आणि विशेषतः युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

शनिवार, 12 रोजी, ‘कृषी तांत्रिक व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा), दक्षिण गोवा, कृषी संचालनालय आणि भारत ॲग्रो सर्व्हिसेस, रिलायन्स पॉलिमर तसेच अल्ट्रा नॉनवोवन यांच्या संयुक्त विद्यमाने आमोणे येथे बलराम निवासी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून पैगिंणच्या सरपंच तथा श्री बलराम निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर, दक्षिण गोवा (आत्मा)चे प्रकल्प संचालक शिवराम गावकर, काणकोणचे कृषी अधिकारी किर्तीराज गावकर, सभापतींचे ओएसडी नागेश कोमरपंत, भारत ॲग्रो सर्व्हिस कोल्हापूरचे तांत्रिक सल्लागार उद्यायन, प्रकाश कुलकर्णी, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई उपस्थित होते.

पंचसूत्री कार्यक्रमाद्वारे नारळाची लागवड आपण कशी करू शकतो, याविषयी कृषितज्ज्ञ डॉ. दिलीप नागवेकर यांनी माहिती दिली. तर सत्यजित विजय भोसले यांनी हवामानानुसार फळ व भाजीपाल्याची लागवड कशी करावी, याची जाणीव करून दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवराम गावकर यांनी केले. नागेश कोमरपंत यांनी आभार मानले.

ऑरमिकेम सेंद्रीय खतामुळे 30 ते 40 टक्के उत्पन्नवाढ !

भारत ॲग्रो सर्व्हिसेस या कंपनीने चाळीस वर्षे प्रयत्न करून ऑरमिकेम या सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. या खताचा वापर केल्याने नारळ, केळी आदींबरोबरच कृषी पिकांमध्ये 30 ते 40 टक्के वाढ होत असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.

दापोली-रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाने याचा प्रयोग करून हे सिद्ध केले आहे, असे भारत ॲग्रो सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोव्यात ऑरमिकेम या सेंद्रीय खनिज सूक्ष्म द्रव्य खताचे वितरक बेतोडा-फोंडा येथील अथर्व ॲग्रोवत एजन्सी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT