Goa Police: 'सर्वाधिक गुन्हे' तरीही कुमक कमीच; गृह खात्याने लक्ष देण्याची गरज

Goa Police: म्हापसा पोलीस स्थानकात कमीत कमी दहा उपनिरीक्षकांची गरज आहे.
Goa Police | Mapusa Police station
Goa Police | Mapusa Police stationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: उत्तर गोव्यातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद बार्देश तालुक्यातील म्हापसा पोलीस स्थानकात होते, असे असतानाही या पोलीस स्थानकात पोलीस अधिकाऱ्यांची वानवाच भासते. एकाचवेळी जेव्हा दोन-तीन गुन्हे घडतात व अधिकारी आपली ड्युटी संपवून घरी जातात तेव्हा मात्र शिल्लक अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढते.

म्हापसा पोलीस स्थानकात कमीत कमी दहा उपनिरीक्षकांची गरज आहे. यात महिला पोलीस उपनिरीक्षक तीन आहेत. त्यातील एक ‘चाईल्ड केअर’ रजेवर आहे. उरलेल्या दोनपैकी एका महिला अधिकाऱ्याची इतरत्र बदली झालेली आहे. त्यामुळे येथे एकच महिला उपनिरीक्षक आहेत. येथे चार महिला उपनिरीक्षकांची गरज आहे.

Goa Police | Mapusa Police station
Goa News: काब्रालच्या तक्रारीमागचा शुक्राचार्य कोण? 'खरी कुजबूज'

चार उपनिरीक्षकांची गरज

म्हापसा पोलिस स्थानकात तीन साहाय्यक उपनिरीक्षक आहेत. त्यातील एक डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. या ठिकाणी चार साहाय्यक उपनिरीक्षकांची गरज आहे. 20 हवालदारांची गरज असताना सध्याची संख्या 14 असून त्यातील 5 जणांची बदली झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल 112 असून आणखी 50 जणांची गरज आहे.

एकंदरीत, सध्याची कर्मचाऱ्यांची संख्या पाहता म्हापसा पोलीस स्थानकात पोलीस अधिकारी व इतर पोलीस कमी आहेत. गृह खात्याने याची नोंद घेऊन तत्काळ म्हापसा पोलीस स्थानकात अधिकाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.

गुन्ह्यांची नोंद अशी

1 खून, 2 खुनी हल्ले, 3 बलात्कार, 1 चोरीचा प्रकार, दिवसाढवळ्या घर फोडणे 3 प्रकार, रात्रीचे 4 प्रकार, गाड्या चोरणे 19 प्रकार, घरफोड्या 11 प्रकार, तोतया पोलीस बनून महिलांना लुबाडणे, मोबाईल हिसकावणे 10 प्रकार, 24 जणांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करणे, गाड्यांना आग लावणे 2 प्रकार, दंगली 4 प्रकार, इतर भांडणे 21 प्रकार, अपहरण 8 प्रकार, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण व शिविगाळ करणे 6 प्रकार, अपघात 9 प्रकार, अन्य 15 प्रकार, विनयभंग 13 प्रकार, महिलांची छेडछाड करणे 3 प्रकार, इतर 43 प्रकार अशी गुन्हे नोंद आहेत.

Goa Police | Mapusa Police station
Goa News: गोवा जेटी धोरणावरुन गोंधळ शक्य! गंभीर समस्या निर्माण होणार

संजय बर्डे, काँग्रेस प्रवक्ता-

म्हापसा पोलीस स्थानकात पोलीस अधिकारी व इतर पोलीस कमी असल्याने लोकांना त्याचा त्रास होतो. म्हापसा हे उत्तर गोव्यातील सर्वात मोठे आणि जास्त गुन्हे नोंद होणारे पोलीस स्थानक आहे. त्यामुळे येथे पोलीस फौजफाटा असल्यास लोकांना न्याय देण्यास वाव मिळेल. सरकारने येथे जास्त अधिकाऱ्यांची व पोलिसांची भरती करण्याची आवश्यकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com