कळंगुट (Calangute) पंचक्रोशीला सतत ग्रासणार्या अनेक समस्यांवरुन (Problems of Calangute Panchkroshi) संतापलेल्या कळंगुट मतदारसंघ (Calangute Constituency) फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर व इतर यांच्यामार्फत स्थानिक पंचायतीला एकोणीस मागण्यांचे एक विशेष निवेदन सरपंच शॉन मार्टिन्स यांना सादर करण्यात आले. पंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात कळंगुटला शहरीकरणाचा दर्जा (City Status) देण्याचा मुद्दा तसेच नुकतेच विधानसभेत (Goa Assembly) घाई-गडबडीत संमत करून घेतलेल्या भुमीपुत्र विधेयकावर फोरमकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. (Goa)
त्याशिवाय स्थांनिकांना विश्वासात न घेतां तयार करण्यात आलेला किनारी प्रदेश आराखडा, पंचक्रोशीतील विशेष करून 'बागा' सारख्या जगप्रसिद्ध समुद्र किनार्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची पावसामुळे झालेली दयनीय अवस्था आणी पंचायत कार्यालयाकडून नियमित अहवाल सादर न करता पंचायत फंडाचा होणारा बेहिशोबी घोळ आदी प्रश्नांची उत्तरे या निवेदनाद्वारे फोरमकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.