Good News: पर्यटनासाठी गोवा खुला, मात्र घ्यावी लागणार 'ही' काळजी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी काही ठिकाणे उघडण्याबाबत काही निर्बंध शिथिल केले आहेत.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीने (Covid19) जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा विळखा सैल करण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) लावला आणि जग ठप्प झालं. यामुळे लहान मोठ्या व्यवसायिकांसोबतच सर्वसामान्यांनाही झळ बसली. लोक घरात असल्याने गोव्यातील पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फटका बसला. मात्र आता महामारीचा प्रभाव ओसरत असल्याने सर्व काही सुरळीत होताना दिसते आहे. त्यामुळे कोरोना लॉकडाऊनमुळे प्रचंड तोट्याचा सामना करणाऱ्या गोव्याच्या पर्यटन (Goa Tourism) उद्योगाला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली कारण राज्य प्रशासनाने काही निर्बंधांसह राज्यातील पर्यटन उपक्रम उघडण्यास परवानगी दिली. (Goa is open for tourism, but you have to take care of these things)

राज्य प्रशासनाने रविवारी, 8 ऑगस्ट रोजी आदेश जारी केला आणि असे नमूद केले की कर्फ्यू 16 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहील. यापुर्वीच्या आदेशानुसार 10 ऑगस्ट रोजी संपणार होता मात्र, सविस्तर आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही ठिकाणे उघडण्याबाबत काही निर्बंध शिथिल केले आहेत आणि अनेक निर्बंधांसह काही अस्थापना उघडल्या आहेत.

Goa Tourism
Goa: कंटेनर सेवा पूर्ववत करण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक

दरम्यान, कसिनो अद्यापही उघडले गेलेले नाहीत. सभागृह, स्पा, मसाज पार्लर, वॉटरपार्क, सिनेमा हॉल, रिव्हर क्रूज देखील उघडण्यात आलेले नाहीत. तसेच हॉल 50% क्षमतेने सुरु केले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com