Goa News | Electrical Substation Dainik Gomantak
गोवा

Goa News: कळंगुटमध्ये '25' कोटी रुपये खर्चून उभारले वीज उपकेंद्र!

Goa News: गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या.

दैनिक गोमन्तक

Goa News: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कळंगुट गावात स्थानिकांच्या वस्तीबरोबरच पावलोपावली छोटे-मोठे गेस्ट हाऊस, रिसॉर्टस तसेच मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्सही वाढत आहेत. त्यामुळे गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या. हा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्चून 14 नोव्हेंबरला उच्च क्षमतेचे वीज उपकेंद्र कार्यान्वित होणार असल्याची माहिती कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिली.

पूर्णत्वास आलेल्या वीज उपकेंद्राच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर लोबो प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कळंगुटच्या उपसरपंच गीता परब तसेच वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते. ऑगस्ट 2021 मध्ये सुरू केलेले या वीज उपकेंद्राचे बांधकाम एका वर्षात पूर्ण केल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले.

बार्देश तालुक्याला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी साळगाव येथील वीज उपकेंद्राची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलणी केल्याचे लोबो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT