Calangute | Club Dainik Gomantak
गोवा

Goa Club Case: वेश्‍यांचे प्रलोभन दाखवून क्‍लबमध्‍ये ओढून नेले; पैसे दिले नाहीत म्‍हणून केली मारहाण!

Calangute: 'डेविल्स' हल्लाप्रकरणाला आता वेगळे वळण लागण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमन्तक

Calangute: गावरावाडा-कळंगुट येथे रविवारी रात्री आम्‍ही फेरफटका मारत असताना ‘डेविल्स नाईट’ क्लबशी संबंधित परप्रांतीय दलालांनी वेश्‍‍याव्‍यवसायासाठी जबरदस्तीने आम्‍हाला नाईट क्लबमध्ये ओढून नेले व पैशांची मागणी केली. आम्‍ही नकार दिल्‍यावर शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली.

दरम्यान, यावेळी आम्‍ही त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून तेथून पळ काढला. झटापटीत दोन्ही बाजूच्‍या युवकांना दुखापत झाली, असा दावा स्थानिक स्वप्नेश वायंगणकर, रोहित पालकर व सनी कांदोळकर यांनी केला आहे. त्‍यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्‍याची शक्‍यता आहे.

‘डेविल्स नाईट’ क्लबवर रविवारी मध्यरात्री हल्ला करून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा ठपका ठेवून कळंगुट पोलिसांनी स्थानिक स्वप्नेश वायंगणकर, रोहित पालकर व सनी कांदोळकर यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. पण या युवकांचा दावा आहे की हा आरोप खोटा आहे.

आपले म्‍हणणे पटवून देण्‍यासाठी त्‍यांनी आज मंगळवारी स्थानिक आमदार मायकल लोबो व सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची भेट घेऊन म्‍हणणे मांडले. तसेच या भागात बेकायदा कार्यरत असलेले डान्स बार तसेच नाईट क्लबवर तात्काळ कारवाई न केल्यास गावातील लोकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

तसेच, डेविल्स नाईट क्लबचे मालक देव यादव यांनी आपल्‍या क्‍लबवर रविवारी मध्यरात्री हल्ला करण्‍यात आल्‍याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्‍यानुसार पोलिसांकडून या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर काल दुपारी स्थानिक सनी कांदोळकर व रोहित पालकर यांनी कळंगुटचे आमदार मायकल लोबो व सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची ग्रांमस्थांसह भेट घेतली.

मायकल लोबो, आमदार-

सरकारकडून अशा प्रकारांची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. मी स्वतः याबाबत पर्यटनमंत्री व पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणी करून स्थानिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. कायदा कुणीच हाती घेऊ नये, मग तो स्थानिक असो अथवा परप्रांतीय. बेकायदा डान्स बार बंद झालेच पाहिजेत.

जोसेफ सिक्वेरा, सरपंच-

कळंगुटमध्‍ये परप्रांतीयांनी बेकायदा डान्स बार थाटून स्थानिकांचे जगणे असह्य केले आहे. यापुढे कुठल्याही परिस्थितीत असे दादागिरीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. बेकायदा डान्स बारना सात दिवसांच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर धडक कारवाई सुरू करण्‍यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा ट्रीपचे स्वप्न भंगले! तरुणीने काकाच्याच घरी घातला दरोडा; मित्रांच्या मदतीने चोरले 65 लाखांचे सोने

Goa Assembly Live: 'जुन्या गोव्यासाठी मास्टर प्लॅनची मागणी' युरी आलेमाओ

Goa Assembly Session: "आम्ही मतांचे राजकारण करत नाही,गोव्याच्या भल्यासाठी काम करतोय!" EHN वादावर मुख्यमंत्र्यांचे सरदेसाईंना 'सडेतोड' उत्तर

Goa Panchayat Tax Scam:प्रत्येक पंचायतीत नाकाखाली कर चुकवेगिरीचा घोटाळा; वेंझीच्या प्रश्नावरुन मंत्री गुदिन्होंनी पंचायतीना दिला कडक इशारा

ICC Test Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारीत उलटफेर! यशस्वी जयस्वालला मोठा फटका, जो रुट पहिल्या स्थानी कायम; पंतने घेतली आघाडी!

SCROLL FOR NEXT