Goa | Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa: हॉटेलच्या खोलीत झोपले असताना...पीडित रशियन तरुणीने सांगितली आपबीती

Goa: पीडित रशियन तरुणीवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: कळंगुटमधील एका हॉटेलात रशियन तरुणीवर काल शुक्रवारी दोघा नेपाळी युवकांनी केलेल्या बलात्कार प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टींना वाचा फुटली आहे. पोलिसांनी पीडित रशियन तरुणीची जबानी नोेंदवली असून त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्याखेरीज याची वाच्यता करता येणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पीडित रशियन तरुणी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. हा अहवाल मिळाल्यानंतर पुढील तपासाला गती मिळणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

काल पीडितेने पोलिसांना जबाब देताना हॉटेलमध्ये गुरुवारी आपल्यावर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगाचा पाढाच वाचला. आपण हॉटेलच्या खोलीत झोपलेल्या स्थितीत असताना संशयित शकील अन्सारी तसेच शहीमुद्दिन अन्सारी यांनी अनन्वित अत्याचार केले, असे तिने पोलिसांना सांगितले.

संशयितांना कोठडी

रशियन तरुणीवरील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शकील अन्सारी आणि शहीमुद्दिन अन्सारी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी सकाळी बलात्काराची घटना घडली होती. कळंगुट पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत संशयितांना बारा तासांच्या आत ताब्यात घेतले.

परप्रांतीयांची कसून चौकशी होणार

या बलात्कार प्रकरणामुळे कळंगुट (Calangute) परिसर हादरून गेला असून देशी-विदेशी पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर परप्रांतीय तरुणांना हॉटेल-रिसॉर्टमध्ये कामावर ठेवताना त्यांची पार्श्वभूमी तपासून पाहावी तसेच त्यांच्या संशयास्पद हालचालींवर स्वतः नजर ठेवण्याबरोबरच पोलिसांना सतर्क करण्याचे आवाहन हॉटेलमालकांना केले आहे. बार्देश तालुक्यात पोलिसांनी भाडेकरूंची चौकशीही सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT