Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar: गोव्यातील बाराही तालुक्यांना समान न्याय देणार; ढवळीकरांचे आश्वासन

Sudin Dhavalikar: बार्देशात 200 कोटींची कामे हाती घेण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Michael Lobo: वीज खात्याचा कार्यभार सांभाळल्यापासून राज्यातील बाराही तालुक्यांना आपण समान न्याय देण्याचा प्रयत्न करीत असून आतापर्यंत राज्यभरात 390 कोटींची कामे मार्गी लावली आहेत. एकट्या बार्देशातच 200 कोटींची कामे हाती घेण्यात आल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

आराडी-कळंगुट येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे उद्‌घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ढवळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो, मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस, नोडल अधिकारी मयुर हेदे, झेडपी दत्तप्रसाद दाभोलकर, कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा, उपसरपंच गीता परब, जमीनमालक एलन पिंटो, वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मंगळवारपासून कार्यान्वित होत असलेल्या आराडी-कळंगुटातील वीज उपकेंद्रामुळे भविष्यात ही समस्या दूर होणार असल्याचे वीजमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘जायका प्रकल्प महत्त्वाचा’

ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान युक्त जायका प्रकल्प 2004 साली पणजीत आणण्यात आपली प्रमुख भूमिका होती. आजच्या घडीस संबंध आशिया खंडात जायकाचे 2000 प्रकल्प कार्यान्वित आहेत, असे ढवळीकर यांनी सांगितले.

साळगाव उपकेंद्र व्हावे

पाच वर्षांपूर्वीच्या साळगाव येथील वीज उपकेंद्राच्या कामास पुन्हा गती देण्यात यावी. हे केंद्र सुरू झाल्यास बार्देशातील वीज समस्येला कायमचा लगाम बसेल, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Crime: 2 वर्षांत 256 देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्‍ह्यांच्‍या घटना! मुख्‍यमंत्र्यांची माहिती; सर्वाधिक प्रकरणे चोरीची

Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

Liquor Seized: गोव्यात चेकनाक्‍यांवर 3.14 कोटींची दारू जप्‍त! मागच्या वर्षी मोठी कारवाई; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

Goa POGO Bill: 20 डिसेंबर 1961 पूर्वी जे गोव्यात होते तेच खरे गोमंतकीय, 'त्यांचे' हित जोपासणार तरी कधी?

SCROLL FOR NEXT