Goa Cabinet Reshuffle| Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळात दोघांना घेण्याच्या हालचाली सुरू; मात्र दोघांची खुर्ची धोक्यात

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला मंत्रिमंडळातील बदलाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Cabinet Reshuffle: गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला मंत्रिमंडळातील बदलाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत गेले. ते पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसमधून 8 आमदार भाजपात आले. त्यापैकी 5 जणांना विविध प्रकारची पदे देण्यात आली. तर तीन वरिष्ठ आमदारांना अद्याप कोणतीही पदे देण्यात आलेली नाहीत. त्‍यात दिगंबर कामत, मायकल लोबो आणि आलेक्स सिक्वेरा यांचा समावेश आहे.

यापैकी काहींना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, असा शब्द केंद्रीय नेत्यांनी दिला होता, अशी माहिती आहे. यापैकी एकाला अथवा दोघांना मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र यासाठी विद्यमान मंत्रिमंडळातील दोन आमदारांना वगळावे लागणार आहे. यासाठीच मुख्यमंत्री केंद्रीय नेत्यांशी चर्चा करत आहेत.

मंत्रिमंडळात बदल करायचा झाल्यास किंवा अन्य मंत्र्यांना मंत्रिमंडळात घ्यावयाचे झाल्यास विद्यमान मंत्रिमंडळात जितक्या मंत्र्यांना घ्यावयाचे आहे, तितक्याच मंत्र्यांना वगळावे लागणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT