Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: गोवा मंत्रिमंडळात लवकरच होणार मोठा बदल, खुद्द CM प्रमोद सावंतांनी दिले संकेत

Pramod Yadav

Goa Cabinet Reshuffle

पणजी: गोवा मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत सुरु असलेल्या चर्चांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे दुजोरा दिला आहे. मंत्रिमंडळात लवकरच महत्वाचा बदल करण्याबाबत सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सावंतांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

'भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण झालीयेत, आगामी निवडणुकीसाठी तीन वर्षे बाकी आहेत. राज्यात अनेक महत्वपूर्ण बदल झालेत. अजूनही व्हायची गरज आहे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न पाहत असताना, टीम गोवा विकसित गोवा २०४७ साठी प्लॅनिंग करण्याची गरज आहे.'

'येत्या काळात मंत्रिमंडळात काही बदल होतील, मी नाही म्हणत नाही. पण, यासाठी अजून काही वेळ जाईल', असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. मुख्यमंत्री सावंत यांनी मंत्रिमंडळात बदलाची गरज असल्याचे या मुलाखती दरम्यान नमूद केले.

मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याने मंत्रिमंडळातील बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सरकारसाठी अडचणीच्या ठरलेल्या मंत्र्यांची गच्छंती आता अटळ असल्याचे यातून दिसत आहे.

'ऑल इज वेल'

कळंगुटचे आमदार मायकल आमदार लोबो यांनी गोवा सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल, असे म्हटल्याने सत्ताधारी भाजपमध्ये धूसफूस सुरु झाली. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असताना काही विधेयकं माघारी घ्यावी लागली त्यामुळे लोबोंनी ऑल इज नॉट वेल, असे म्हटले होते.

लोबोंच्या वक्तव्याची प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गंभीर दखल घेऊन पक्षाची प्रतिमा खराब होईल आणि विरोधकांना फायदा होईल, अशी वक्तव्य न करण्याची समज दिली.

याबाबत मुख्यमंत्री सावंत यांना विचारणा केली असता सरकारमध्ये 'ऑल इज वेल' असल्याचे म्हटले आहे. 'काही जणांना मनासारखे झाले नाही तर ऑल इज नॉट वेल वाटायला लागते. पण, सगळे सुरळीत सुरु आहे. गोवा विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे,' असे सावंत यांनी या मुलाखतीत नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT