Positive Story: प्रामाणिकपणाला सलाम! 10 लाखांचे सापडलेले ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत

North Goa Police: पूलाखाली सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला परत केले.
Positive Story: प्रामाणिकपणाला सलाम! 10 लाखांचे सापडलेले ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत
Mapusa, Goa PoliceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: तब्बल दहा लाख रुपयांचे सापडलेले ब्रेसलेट मूळ मालकाला परत करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. उत्तर गोवा पोलिसांनी याबाबत सोशल मिडियावर याबाबत एक पोस्ट करुन मयडे येथील व्यक्तीचे कौतुक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयडे येथील रहिवासी प्रदीप पालयेकर यांना मयडे येथील पुलाजवळ सोन्याचे ब्रेसलेट सापडले. पालयेकरांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत सापडलेले ब्रेसलेट म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांकडे ब्रेसलेट हरवल्याबाबत प्राप्त तक्रारीवरुन ब्रेसलेटचे मूळ मालक श्रीकांत रायकर यांना परत केले.

प्रदीप पालयेकर यांच्या हस्तेच श्रीकांत यांना ब्रेसलेट परत करण्यात आले. पोलिसांनी पालयेकरांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

Positive Story: प्रामाणिकपणाला सलाम! 10 लाखांचे सापडलेले ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत
Dudhsagar Waterfall: पर्यटकांनो लक्ष द्या! 'दूधसागर'बाबत नवीन अपडेट, या वेबसाईटवरून करा Time Slot Booking

प्रामाणिकपणाचे कौतुक

पालयेकरांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सध्याच्या जगात प्रत्येकजण स्वर्थाचा विचार करत असताना पालयेकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत पोलिसांशी संपर्क साधून सापडलेले सोन्याचे महागडे ब्रेसलेट मूळ मालकाला परत केले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DA DR Hike July 2026 Announcement
Rashol MRF Waste Shed Case
8th Pay Commission Fitment Factor Salary Calculation
Rahul's mother makes emotional appeal to Deepvihar school principal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com