Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: 'मी फक्त चहा घेण्यासाठी आलो होतो'; मंत्रिमंडळ विस्तारावर आरोग्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

Goa Cabinet Reshuffle: गोव्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा झाली का याबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना विचारण्यात आले.

Pramod Yadav

Goa Cabinet Reshuffle

पणजी: गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. याबाबत गेल्या वर्षा अखेरीस वेगवान घडामोडी घडल्या, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्ली दौरा देखील केला. नव्या वर्षाचे दोन महिने निघून गेल्यानंतर भाजचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या गोवा दौऱ्यानंतर पुन्हा एकदा विस्ताराच्या चर्चांणा उधाण आले आहे.

बी. एल. संतोष मंगळवारी (०४ मार्च) अखिल भारतीय महिला मोर्चा संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोव्यात आले होते. यावेळी त्यांनी पणजीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह विविध मंत्री, आमदार आणि नेत्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोव्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा झाली का याबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना विचारण्यात आले.

विश्वजीत राणे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावर भाष्य करण्याचे टाळत, मी फक्त चहा घेण्यासाठी आलो होतो, असे उत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर मी एक सामान्य आमदार आहे, असेही राणे म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा निराधार आहेत असे म्हणत बी. एल. संतोष संघटनात्मक बैठक घेण्यासाठी गोव्यात आले होते. राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी संतोष गोव्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

गोवा मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या वर्षीपासून रखडला आहे. विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर लगेच आलेल्या लोकसभा आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमुळे याबाबतचा निर्णय लांबवणीवर पडला. २०२४ च्या वर्षाअखेरीस निर्णय होईल असे वाटत असताना याबाबत तसा काही निर्णय झाला नाही. दरम्यान, बी. एल. संतोष यांच्या गोवा भेटीने याबाबत प्रश्न उपस्थित केला असता, प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी याबाबतचे दावे खोडून काढले आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले आहे. २०२७ निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सूतोवाच शेट्ये यांनी केले आहे. तर, माजी मंत्री आणि भाजप नेते पांडुरंग मडकईकरांनी राज्यातील भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT