Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: तवडकर, कामत यांना खातेवाटप, मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची जबाबदारी; कोणाकडे कोणती खाती? वाचा संपूर्ण यादी..

Goa Cabinet: खातेवाटप करताना सुदिन ढवळीकर यांच्याकडील गृहनिर्माण तर सुभाष फळदेसाई यांच्याकडील पुरातत्व व पुराभिलेख खात्यांचा ताबा मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतला आहे.

Sameer Panditrao

पणजी: अखेर सातव्या दिवशी नव्या मंत्र्यांना खाती मिळाली. मंत्री दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम, बंदर कप्तान, कायदेशीर मोजमाप; तर रमेश तवडकर यांना कला व संस्कृती, आदिवासी कल्याण, क्रीडा खाते देण्‍यात आले आहे.

खातेवाटप करताना सुदिन ढवळीकर यांच्याकडील गृहनिर्माण तर सुभाष फळदेसाई यांच्याकडील पुरातत्व व पुराभिलेख खात्यांचा ताबा मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतला आहे. सुदिन ढवळीकर यांना गोवा गॅझेटियर व ऐतिहासिक नोंदी तर फळदेसाई यांना पेयजल खाते जादाचे दिले आहे.

कामत यांना अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचा ताबा मिळाला आहे. शिक्षण खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. या बदलात विधिमंडळ कामकाज, कायदा व पर्यावरण खातीही मुख्यमंत्र्यांकडे आल्याने नजीकच्या काळात मंत्रिमंडळात आणखी फेरबदल केला जाऊ शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.

त्यातच खातेवाटपासाठी मुख्यमंत्र्यांनी हात सैल न केल्याने नव्याने येणाऱ्या मंत्र्यांना देण्यासाठी काही खाती राखून ठेवली असावीत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन मंत्र्यांपैकी एकाकडून महसूल खात्याची मागणी झाल्याने हे खातेवाटप लांबणीवर पडले होते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हे खाते आपल्याकडून काढून घेऊ नये अशा भावना व्यक्त केल्या होत्या, असेही सांगण्यात येते. विशेषतः कोमुनिदाद व सरकारी जमिनींवरील घरे नियमित करण्याची विधेयके संमत केल्यानंतर हे खाते काढून घेतल्यास त्याचा उलट संदेश जाईल, याकडे बोट दाखवण्यात येत होते. त्यामुळे महसूल खाते मोन्सेरात यांच्याकडेच राहिले आहे.

कोणाकडे कोणती खाती?

१. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गृह, वित्त, कार्मिक, दक्षता, राजभाषा व अन्य.

२.मंत्री विश्वजीत राणे

आरोग्य, नगरविकास, शहर व ग्राम नियोजन, महिला व बाल विकास, वन.

३. मंत्री माविन गुदिन्हो

वाहतूक, उद्योग, पंचायतराज, राजशिष्टाचार.

४.मंत्री रवी नाईक

कृषी, हस्तकला, नागरी पुरवठा.

५. मंत्री सुभाष शिरोडकर - जलसंपदा, सहकार, प्रोव्हेदोरिया.

६.मंत्री रोहन खंवटे

पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, छपाई आणि लेखनसामग्री.

७. मंत्री आतानासिओ मोन्सेरात - महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन.

८.मंत्री सुदिन ढवळीकर

वीज, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, वस्तुसंग्रहालये, गोवा गॅझेटियर व ऐतिहासिक नोंदी.

९.मंत्री नीळकंठ हळर्णकर मत्स्यव्यवसाय, प्राणीपालन व पशुवैद्यकीय सेवा, कारखाने व बाष्पक.

१०. मंत्री सुभाष फळदेसाई समाजकल्याण, पिण्याचे पाणी, दिव्यांग सबलीकरण, अंतर्गत जलमार्ग.

११. मंत्री दिगंबर कामत

सार्वजनिक बांधकाम, बंदर कप्तान, कायदेशीर मोजमाप.

१२. मंत्री रमेश तवडकर

कला व संस्कृती, आदिवासी कल्याण, क्रीडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vishwajit Rane Meet Fadanvis: मंत्री विश्वजीत राणेंनी मुंबईत घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Chess World Cup 2025: '...अन् तो डिस्कोत मनसोक्त नाचला', 23 वर्षांनी गोव्यात बुद्धीबळ विश्वचषक; आयोजकांनी सांगितला इराणी खेळाडूचा 'तो' किस्सा

Viral Video: उंदीर मामाने पळवला गणपती बाप्पाचा मोदक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; फोंड्यातील मजेशीर घटनेने वेधले लक्ष

Goa liquor Smuggling: जीव धोक्यात, तिजोरीची लूट; दारु तस्करीबाबत विजय सरदेसाईंचे वित्त सचिवांना पत्र

Goa Live Updates: गणेश चतुर्थी निमित्त मंत्री राणेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT