CM pramod sawant
CM pramod sawant dainik gomantak
गोवा

गृह आणि वित्त खातं मुख्यमंत्र्यांकडेच राहणार

दैनिक गोमन्तक

पणजी : खातेवाटपाचा आदेश आज संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गृह आणि वित्त ही दोन्ही महत्त्वाची खातीही मुख्यमंत्र्यांकडेच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गोव्यात ही दोन्ही खाती शक्यतो मुख्यमंत्र्याकडेच ठेवली जातात, त्यामुळे या दोन्ही खात्याचा पदभार मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे.

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यासह अन्य 8 मंत्र्यांनी 28 मार्च रोजी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजूनही खातेवाटप करण्यात आलं नव्हतं. पाडव्याच्या मुहुर्तावर खातेवाटप जाहीर होणार असं बोललं जात होतं. आता मुख्यमंत्र्यांनीच संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या विश्वजीत राणेंना सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचं खातं दिलं जाणार असंही बोललं जात होतं. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून विश्वजीत राणेंची (Vishwajit Rane) मनधरणी करताना तसं आश्वासन दिल्याचीही चर्चा होती. त्यामुळे त्यांना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विश्वजीत राणेंना उपमुख्यमंत्रीपदासह एखादं महत्त्वाचं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तारही अजून झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्याचं आव्हान मुख्यमंत्री प्रमोद सावंतांसमोर आहे. गोव्याच्या (Goa) कॅबिनेटमध्ये जास्तीत जास्त 11 मंत्री असू शकतात. यापैकी 8 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. उर्वरित 3 जागांमध्ये अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकरांचं नाव चर्चेत होतं. मात्र ऐनवेळी या तिघांचीही नावं यादीतून काढण्यात आल्याची कुजबुज होती. दरम्यान सध्या या तीन मंत्रिपदांच्या शर्यतीत आलेक्स रेजिनाल्ड, सुदिन ढवळीकरांच्या नावाची चर्चा कायम आहे. मात्र त्यांच्यासोबतच थिवीचे भाजप (BJP) आमदार नीळकंठ हळर्णकर आणि नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांच्या नावांचीही जोरदार चर्चा आहे. मगोपच्या जीत आरोलकर यांनाही भाजपकडून ऑफर असल्याचं बोललं जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT