Goa Politician cabinet Minister Sex scandal Allegation
Goa Politician cabinet Minister Sex scandal Allegation  Dainik Gomantak
गोवा

गोवा कॅबिनेट मंत्र्याचा सेक्स स्कँडल, अपहरणात समावेश? पंच महिलेशी चाळे, चोडणकरांनी शेअर केली खळबळजनक बातमी

Pramod Yadav

Goa: गोवा कॅबिनेटमधील मंत्री आणि बड्या नेत्याने एका पंच महिलेचे अपहरण करुन तिच्याशी अश्लिल चाळे केल्याची खळबळजनक बातमी, गोवा काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

बीच रिसॉर्टवरील वाढदिवसाच्या पार्टीनंतर उत्तर गोव्यातील एका फार्म हाऊसवर हा नेता परिसरातील पंच महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापड्यालाचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. सध्या ही बातमी सर्वत्र प्रचंड व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या पतीला या घटनेची माहिती मिळताच त्याने फार्म हाऊसला भेट दिली. यावेळी तो राजकीय नेता महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला. पतीने पोलिसांत धाव घेतली. मात्र, त्यालाच तेथे डांबून ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याची सुटका केली. असेही या बातमीत म्हटले आहे.

नेत्यानेच पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिल्याचा उल्लेख बातमीत करण्यात आला आहे. नेत्याचे दिल्ली दरबारी मोठे वजन असून, बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबण्यात आले. तसेच, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही असाही दावा या बातमीत करण्यात आला आहे.

व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणाची दिल्ली दरबारी दखल घेण्यात आली आहे मात्र, प्रकरण बाहेर पडल्यास पक्षाची बदनामी होईल आणि पक्षाला त्याचा येत्या लोकसभा निवडणुकीला फटका बसेल असे या बातमीत म्हटले आहे.

या प्रकरणातील राजकीय नेता अशा कृत्यांसाठी बदनाम असून, त्याच्या पत्नीला यापूर्वी देखील तो रेड हँड सापडला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने घटस्फोटसाठी धाव घेतली होती.

दरम्यान, या प्रकरणामुळे हा नेता नेमका कोण याची चर्चा खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT