Goa Cabinet Decisions | CM Pramod Sawant And Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Decisions: तात्पुरत्या शॅकसाठी टीसीपी मान्यतेची गरज नाही; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

Goa Cabinet Decisions: कंदब महामंडळासाठी ५० नव्या इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

Pramod Yadav

Goa Cabinet Decisions

गोवा मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्वाच्या बैठकीत आज (सोमवारी) विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी तात्पुरत्या शॅकसाठी आता टीसीपी मान्यतेची गरज नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

आता पर्यटन खाते आणि पर्यावरण खात्याच्या परवानगीने तात्पुरत्या शॅक उभारणीला मान्यता देण्यात येईल. बैठकीत अध्यादेश संमत करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते.

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याच्या योजनेला २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. उशीरा अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पडताळणीचे काम सुरु असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

कंदब महामंडळासाठी ५० नव्या इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण मित्रांना वेतन दिले जाणार असल्याचे सावंत म्हणाले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील दोन पदे कंत्राट पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सुपरस्पेशालिटी विभागातील कायमस्वरुपी डॉक्टरांच्या वेतनात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या शॅक्ससाठी आता टीसीपी खात्याची परवानगी आवश्यक नसेल, पर्यटन खाते आणि पर्यावरण खात्याच्या परवानगीने शॅक्स उभारता येतील, असे सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा नियम फक्त शॅक्सच्या ढाच्यासाठी असून, व्यवसायासाठी आवश्यक परवाने त्यांना घ्यावेच लागतील असे, मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात एक स्टेशन, एक उत्पादन हा कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहेत. गोव्यात वास्को रेल्वे स्थानकावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई या कार्यक्रमाला हजेरी लावतील, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT