Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खात्यांच्या वाटपाबाबत मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पुढील आठवड्याच्या शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी 9 मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. 28 मार्च रोजी या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. (goa cabinet expansion to take place next week)

"मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्याच्या शेवटी केला जाईल. त्यानंतर लवकरच पोर्टफोलिओचे वाटप केले जाईल," असे मुख्यमंत्र्यांनी रविवारी संध्याकाळी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पत्रकारांना सांगितले.

खात्यांच्या वाटपाबाबत मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. "भूतकाळात पोर्टफोलिओ हाताळलेल्या अनुभवी मंत्र्यांना महत्वाची खाती देण्यात आली आहेत. ते केंद्रीय योजना पार पाडतील आणि पुढे नेतील," लोकांची कामे जलद मार्गावर करण्यासाठी "शून्य भ्रष्टाचार आणि सुशासन" यावर भर देणार असल्याचे सावंत म्हणाले.

गोव्याच्या (Goa) मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर रविवारी जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याकडे गृह, वित्त या महत्त्वाच्या खात्यांसह कार्मिक, दक्षता आणि राजभाषा खात्यांचा पदभार असेल तर विश्वजीत राणेंकडे (Vishwajit Rane) आरोग्य, नगरविकास, नगरनियोजन, महिला आणि बालकल्याण, वन खात्यांचा पदभार असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT