Third District | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याचा मार्ग मोकळा; गोवा मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Third District In Goa: दक्षिण गोव्यातील धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या चार तालुक्यांचा मिळून एक नवा जिल्हा निर्माण केला जाणार आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात तिसरा जिल्हा निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण गोव्याचे विभाजन करुन तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती केली जाणार असून, यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यात चार तालुक्यांचा समावेश असेल, नव्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे तालुक्यातील कुडचडे येथे असेल.

गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक आग्रही होते. आदिवासीबहुल जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी त्यांनी केली होती. सरकार देखील याबाबत अनुकूल असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती.

तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत सरकारने एक पाऊल पुढे टाकले असून, मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

दक्षिण गोव्यातील धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या चार तालुक्यांचा मिळून एक नवा जिल्हा निर्माण केला जाणार आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय केपे तालुक्यातील कुडचडे येथे असेल. नव्या जिल्ह्याचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

दक्षिण गोव्यातील नागरिकांना प्रशासकीय कामासह विविध जिल्हास्तरीय कामांसाठी मोठा पल्ला पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे नवा आदिवासी बहूल जिल्हा निर्मिती केली जावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या प्रस्तावाला आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. दक्षिण गोव्यातील फोंडा, सासष्टी आणि मुरगाव नव्या जिल्ह्याचा भाग नसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

Goa Theft: गोव्यातील हॉस्पिटलमध्ये केली चोरी, मुंबईला गेला पळून; लोकेशन ट्रेस झाल्यामुळे सराईत चोरटा जेरबंद

Goa ZP Election: विरोधी आघाडीमधील बिघाडाचे नेमके कारण कोणते?

Goa Nightclub Fire: धुरात गुदमरून मृत्यू जवळ आला होता, पण... 'तो' माणूस देवासारखा धावून आला! हडफडे क्लबमधील कझाक डान्सरने सांगितली आपबिती

Goa Live News: 'या दुःखद घटनेने मन हेलावले', क्लब मालक सौरभ लुथरा यांची इन्स्टाग्रामवर पोस्ट

SCROLL FOR NEXT