म्हारगाइसूर Dainik Gomantak
गोवा

'विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणी दिवशीच गोमंतकीयांची खरी दिवाळी'

काँग्रेसच्यावतीने म्हापशामध्ये 'म्हारगाइसूर' या महागाईच्या प्रतीकात्मक नरकासूराची प्रतिमा दहन करण्यात आली.

Dainik Gomantak

Goa: गोव्यातील नरकासुराचा (Narkasur) जरी आज दहन करण्यात येत असले तरी, गोमंतकीय नागरिक आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) मतमोजणीच्या दिवशीच खरी दिवाळी (Diwali) साजरी करतील, असे प्रतिपादन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर (GPCC President Girish Chodankar) यांनी केले. 

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासूर दहनाचा कार्यक्रम होतो. यावेळी काँग्रेसच्यावतीने (Congress) म्हापशामध्ये 'म्हारगाइसूर' (Inflation monster) या महागाईच्या प्रतीकात्मक नरकासूराची प्रतिमा दहन करण्यात आली. त्यावेळी उपस्थित विशाल जनसमुदायासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. 

म्हारगाइसूर

"आजपासून राक्षसांना मारण्याची सुरुवात झाली आहे आणि ती इथेच संपणार नाही. गोमंतकीय निरनिराळ्या रूपात राक्षसांचे दहन करत राहतील आणि या सगळ्या राक्षसांच्या 'निर्मात्यांना' कायमचे घरी पाठवले जाईल, त्यानंतर गोव्यात निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी दिवाळी साजरी होईल. असे चोडणकर यांनी सांगितले. राज्यात सध्या सुरु असलेला त्रास लवकरच संपेल आणि काँग्रेसचे राज्य येईल त्यामुळे हि स्थिती अजून तीन महिने सहन करावी असे आवाहन म्हापसा येथे भाववाढ विरोधी निषेध मोर्चात जमलेल्याना गिरीष चोडणकर यांनी करतानाच, राज्यात सत्तेत आल्यानंतर आठवडाभरातच महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कार्यकारी अध्यक्ष अलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह मोठ्याप्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि जनसामान्य उपस्थित होते. भाजपने कोविडच्या काळात गोमंतकीयांना जीवे मारले आणि जे त्यातून वाचले त्यांना आता दररोज पेट्रोल आणि एलपीजीच्या किमती वाढवून अनावश्यक कर लादून मारले जात असल्याचा आरोप यावेळी चोडणकर यांनी केला. पेट्रोल रु. 107 प्रति लिटर, डिझेल रु. 104, एलपीजी 980, व्यावसायिक रु. 2000 सोबत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. दुसरीकडे 2019 मध्ये 3.18% असलेला महागाई दर 6:26% पर्यंत वाढल्याकडेही त्यांनी लाख वेधले.

म्हारगाइसूर

राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार अत्यंत असंवेदनशील असून, त्यांच्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. त्यामुळे या भाजप सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. देशातील विविध ठिकाणाहून आता परिवर्तनाची सुरुवात झालीच आहे. त्यामुळे गोव्यामध्येही काँग्रेसही मोठा विजय मिळवून इतिहास रुचेल आणि पुढे जाऊन केंद्रातूनही भाजपचा सफाया होईल, असा विश्वास यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.

काँग्रेस हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे, आमच्या राजवटीत प्रत्येक नागरिक सुखी राहील त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसलाच विजयी करा असे आवाहन यावेळी काँग्रेसचे आमदार अॅलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी केले. माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, काँग्रेसचे उपाध्यक्ष व निषेधाचे प्रभारी बाबी बागकर, मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, माजी मंत्री संगीता परब, रुडॉल्फ फर्नांडिस, धर्म चोडणकर, जो डायस आदींनी यावेळी आपल्या भाषणातून भाजप सरकारचा तीव्र निषेध केला.

उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी स्वागत केले तर माजी आमदार ऍग्नेलो फर्नांडिस यांनी आभार मानले. सीपीआयएमचे नेते डॉ. विवेक मोंटेरो यांनीही आंदोलनादरम्यान भाषण केले. सीपीएमआयच्या इतर नेत्यांनीही निदर्शनास हजेरी लावली आणि काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

तत्पूर्वी, बैलगाडीवर ठेवलेल्या "म्हारगाईसूर" च्या पुतळ्यासह खोर्ली ते बोडगेश्वर मंदिर परिसरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. काही आंदोलकांनी रस्सीच्या साहाय्याने मोटारसायकलही खेचल्या. यावेळी पारंपारिक ढोल ताशांच्या तालावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्याचप्रमाणे सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी विविध फलकांचाही वापर करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

SCROLL FOR NEXT