Bulbul International Children's Film Festival Dainik Gomantak
गोवा

Margao News: 'नाळ -2' मराठी चित्रपटाने मडगावात बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ

Margao News: चित्रपट प्रदर्शनांबरोबरच मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ, अवकाश माहिती व्यवस्था; प्रवेश मोफत, 18 वर्षांवरील युवक, युवतींना 200 रुपये सिझन पास

Mangesh Borkar

Margao News:- मडगावच्या रवीन्द्र भवनात संपन्न होणाऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ नागराज मंजुळे यांच्या "नाळ -२" या मराठी चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट महोत्सव ९ ते १३ जानेवारी २०२४ असे पाच दिवस होणार असुन त्यात स्पर्धात्मक गटासाठी ३०, पॅनोरामा (स्पर्धात्मक नाही) गटात ४९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

शिवाय या महोत्सवात कॅनडा, फ्रांस, दक्षिण कोरिया, बेल्जियम, नॉर्वे, हॉलंड, मंगोलिया, जर्मनी, कोलंबिया, स्विडन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, इराण, थायलंड, स्वित्झर्लंड या देशातील मुलांसाठीचे चित्रपट दाखविले जातील अशी माहिती चित्रपट महोत्सवाचे आयोजन समितीचे चेअरमन आमदार दिगंबर कामत यानी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवात एनिमेशन, कार्टुन, पर्यावरणीय, शैक्षणिक, समाजाला संदेश देणारे चित्रपट निवडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेत माजी आमदार दामू नाईक, रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक, योगिराज कामत व अंतरंग प्रॉडक्शनचे बिपीन खेडेकर व सुद्धेश नाईक उपस्थित होते.

या महोत्सवाचे प्रमुख आश्रयदाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असून दामू नाईक हे उपाध्यक्ष आबेत. या बाल चित्रपट महोत्सवाला माहिती व प्रसिद्धी खात्याचे सहकार्य लाभलेले आहे.

चित्रपटाचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ४.३० वाजता होणार असुन त्यानंतर ६.३० वाजता  चित्रपट प्रदर्शनाला सुरवात होणार आहे. रवीन्द्र भवनच्या मुख्य सभागृह, कॉन्फरन्स व ब्लॅक बॉक्स या तिन्हीक़डे सकाळी ९ वाजल्यापासुन चित्रपट प्रदर्शित केले जातील.

शिवाय आके .येथील गुजराती समाज सेवा ट्रस्टच्या शाळेतही चित्रपट प्रदर्शनाची खास व्यवस्था करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

रवीन्द्र भवनच्या खुल्या जागेत पुस्तक प्रदर्शन, अवकाश माहिती (प्लेनेटरीयम),  खुल्या मंचावर प्रत्येक दिवशी समुह नृत्य, बॉलिवुड मिमिक्री, लघुपट प्रदर्शन, फॅशन शो, रिल तयार करणे या स्पर्धा घेण्यात येतील तसेच नृत्य व गायनाचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहे.

विभव प्रभुदेसाई हे ़्ड्रोन तयार करण्याचे कार्यशाळा घेणार असुन डॉ. राजेंद्र भंडाणकर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

गोव्यातील सर्व शालेय, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट महोत्सव असुन अजुन पर्यंत ८ ते १० हजार प्रतिनिधींची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. पालकांनाही हे चित्रपट पहाता येतील.  या महोत्सवासाठी नाळ -२, बाबा, श्यामची आई, बालभारती, कस्तुरी या मराठी चित्रपटांचीही निवड करण्यात आली आहे. 

या चित्रपट महोत्सवासाठी ज्युरींची नियुक्ती करण्यात आली आहे त्यात जारोस्लाव हायनस्टोवा (झेक प्रजासत्ताक), युरीय फेटींग (रशिया), गर्ट हरमन्स(बेल्जियम), अमित मसुरकर (भारत), ओलिविया स्टिवर्ट(युके), बिना पॉल(भारत), फिलिपा कॅम्पबल (न्युझिलंड), जेकीस कोमेट्स (फ्रांस), राजन खोसा (भारत), ओरिजीत सेन (भारत) यांचा समावेश आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT