Goa Traffic Police: नाताळ-नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार; राज्यभरात 800 वाहतूक पोलिस तैनात

Goa Traffic Police: किनारी भागात विशेषत: कळंगुट आणि बागा परिसरामध्ये वाहने पार्क करण्यासाठी 17 ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था
Goa Traffic Police
Goa Traffic Police Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Police: नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने राज्यात वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता उत्तर गोव्यात विशेषत: कळंगुट आणि बागा या किनारी भागांमध्ये वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

एकूणच राज्यभरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी 800 कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

अक्षत कौशल यांनी सांगितले, की दररोज सर्वसाधारणपणे 500 पोलिस कर्मचारी रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करत असतात. मात्र, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची वाढलेली संख्या, त्याचबरोबर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता आणखी तीनशे अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़.

वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांसाठी आणखी पोलिस कर्मचारी रस्त्यावर तैनात करावे लागणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे.

वाहतूक व्यवस्थापन आराखडा

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यालाच पसंती देतात. यानिमित्ताने देशभरातून मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.

अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या असतात. तासन् तास लोक वाहतूक कोंडीत अडकतात. तसेच लहान-मोठे अपघात घडतात. या गोष्टी लक्षात घेऊन वाहतूक खात्याने सविस्तर वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याची माहिती कौशल यांनी दिली.

17 ठिकाणी प्रशस्त वाहनतळ

किनारी भागात विशेषत: कळंगुट आणि बागा परिसरामध्ये वाहने पार्क करण्यासाठी १७ ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.

नाताळनिमित्त चर्चमध्ये होणाऱ्या प्रार्थना सभा लक्षात घेता चर्च परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी त्या भागामध्ये वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक नियम भंग करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे वाहतुकीत शिस्त आल्याचा दावाही अक्षत कौशल यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com