Goa builder Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या बिल्डरची अजबच डील

एकच कार्यालय दोघांना विकण्याचा लावला सपाटा

दैनिक गोमन्तक

म्हापसा: ‘प्रभू कन्स्ट्रक्शन्स’ लोकांची कथित फसवणूक करीत असून, एकच ऑफिस दोघाजणांना विकल्याची घटना उघडकीस आली असल्याचा दावा प्रभू चेंबर्स बिल्डिंगमधील युनिट होल्डर्सनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, हा दावा ‘प्रभू कन्स्ट्रक्शन्स’चे व्यंकटेश प्रभू-मोनी यांनी फेटाळला असून, सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

‘प्रभू कन्स्ट्रक्शन्स’ने कार्यालये विकण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप युनिट होल्डर जितेश कामत यांनी केला आहे. ते म्हणाले, इम्रान सय्यद यांनी 13 जून 2016 रोजी खरेदी केलेले ऑफिस एप्रिल 2021 मध्ये ॲड. केदार शिरगावकर यांना विकण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रशांत देसाई यांचेही ऑफिस विकण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. त्या बिल्डिंगचे ताबा प्रमाणपत्र म्हापसा नगरपालिकेने 12 सप्टेंबर 2019 रोजी मागे घेतले असून, जुन्या ताबा प्रमाणपत्राच्या आधारे बिल्डर प्रभू मोनी ऑफिस विकत आहेत. अन्य एक युनिट होल्डर किशोर भाईडकर म्हणाले, असा प्रकार होऊ शकतो याची पूर्वकल्पना उपनिबंधक कार्यालयाला आम्ही दिली होती. पण, त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले.

प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश!

उपलब्ध माहितीनुसार, सर्व युनिट होल्डर्सनी 12 सप्टेंबर 2019 रोजी आरईआरए (रीअल इस्टेट रेग्‍युलेटरी ऑथोरिटी)मध्ये याचिका दाखल केली आला असून, हे प्रकरण ‘जैसे थे’ (स्टेटस को) ठेवण्याचा आदेश आरईआरएने बिल्डरला दिला आहे.

इम्रान सय्यद यांनी थोड्याफार प्रमाणात पैसे भरले होते. त्यांनी दिलेल्या चार धनादेशांपैकी केवळ दोनच धनादेशांची रक्कम आमच्या खात्यात जमा झाली आहे. त्याबाबत त्यांना पावत्याही दिल्या होत्या. तथापि, त्यांच्याशी विक्री करार झालाच नव्हता. त्यामुळे अन्य एका माणसाला ते कार्यालय विकले असून, त्याबाबत करारही झालेला आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत काही युनिट होल्डर्सनी केलेला दावा पूर्णत: चुकीचा व गैरसमज पसरवणारा आहे. आम्ही ती मालमत्ता विकणार असल्याची नोटिसही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली होती.

- व्यंकटेश प्रभू मोनी, मालक, ‘प्रभू कन्स्ट्रक्शन्स’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Gunshot: "आम्हाला गँग्स ऑफ गोवा'ची भीती!" नायबाग येथे गोळीबार, 2 कामगार गंभीर जखमी; LOP यांचा सरकारवर निशाणा

Formula 4 Race Goa: ‘फॉर्म्युला 4’ रेससाठी नव्या जागेचा शोध! बांबोळी, वेर्णा पठाराची पाहणी; सलग 3 वर्षे होणार आयोजन

Goa Coal Protest: 'कोळशाला विरोध करण्यासाठी गोव्यातील जनतेने सहभागी व्हावे'! सरदेसाईंचे आवाहन; जागृती सभेचे आयोजन

तुफान वादळ, खवळलेला अरबी सागर; 11 दिवस जीवाचा संघर्ष केल्यानंतर 31 मच्छिमारांची घरवापसी

Verca Parasailing Accident: पॅराशूट भरकटले आणि अडकले माडात! ‘त्या’ व्यावसायिकाचा परवाना रद्द; पर्यटन खात्‍याची कारवाई

SCROLL FOR NEXT