Goa Budget Fire and Emergency Services Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023: गोव्याच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा खात्यात होणार बदल; वाचा अर्थसंकल्पातील तरतूदी

Kavya Powar

Goa Budget 2023 Fire and Emergency Services : मागील काही दिवसांपासून गोव्यात राज्यभर आगीच्या घटनांनी अक्षरश: थैमान घातले आहे. खासकरून जंगलात सुरू असलेल्या अग्नितांडवामुळे सगळ्यांचीच चिंता वाढवली होती. यामध्ये कस लागला तो अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचा.

अग्निशमन दलाच्या जवानांनी यामध्ये महत्वाची भूमिका पार पडली आहे. आज (29 मार्च) विधानसभेत सादर करण्यात आलेल्या 2023-24 साठीच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा खात्यात काही तरतूदी केल्या आहेत.

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा खात्यात तरतूदी:

  • यंदा या खात्यासाठी सरकारतर्फे 129.19 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • यामध्ये आधीच्या तुलनेत 21.56 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

  • मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गृह मंत्रालयाद्वारे सामायिक केलेले आपत्कालीन सेवा विधेयक 2023 हे सर्वसमावेशक असून ते गोव्यातील अग्निशमन आणि आणीबाणीच्या सर्व बाबींची पूर्तता करेल.

  • अग्निशमन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एकूण 44.03 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • याअंतर्गत पेडणेतील अग्निशमन केंद्राचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

  • काणकोण अग्निशमन केंद्रासाठी नवीन जमीन शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.

  • डिचोली आणि वाळपई येथील अग्निशमाच्या कामांना गती देण्यात येणार आहे.

  • अति उंच इमारतींमध्ये अग्निशमन बचाव कार्यासाठी 42 मीटर टर्न टेबल शिडी खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT