Goa Budget For Art and Culture Department Dainik Gomantak
गोवा

Goa Budget For Art and Culture Department: कला समृद्ध गोव्याच्या कला आणि संस्कृती खात्यात सरकारच्या नवीन घोषणा

गोवा राज्य कला आणि संस्कृतीने समृद्ध राज्य आहे. त्यामुळे या खात्यातील योजना आणि घोषणांकडे साऱ्यांचे लक्ष होते.

Kavya Powar

Goa Budget For Art and Culture Department: गोव्यात आठव्या विधानसभेचे चौथे अधिवेशन सुरू आहे. आज (29 मार्च) अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. गोवा राज्य कला आणि संस्कृतीने समृद्ध असे राज्य आहे. त्यामुळे या खात्यातील योजना आणि घोषणांकडे साऱ्यांचे लक्ष होते.

कला आणि संस्कृती खात्यातील महत्वाच्या तरतूदी:

  • यंदाच्या अर्थसंकल्पात कला आणि संस्कृती खात्यासाठी 195.60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये 27. 48 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

  • अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे, उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 41 ते 60 वयोगटातील गोव्यातील कलाकारांना 'मुख्यमंत्री कला वृद्धी पुरस्कार' देण्यात येणार आहे.

  • गोव्यातील कला अकादमीचे काम काही कालावधीपासून सुरू आहे. आता हे काम 80% काम पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय काणकोणमधील रवींद्र भवनचे काम 66% पूर्ण झाले असून कुडचडेमधील रवींद्र भवनचे काम 77 % पूर्ण झाले आहे.

  • गोव्यातील सांस्कृतिक वास्तूंचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारतर्फे 45.03 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

Goa Budget For Art and Culture Department
  • फोंड्यात इको–फ्रेंडली ग्रीन लायब्ररी उभारण्यात येणार असून, साखळीमध्ये डिजिटल लायब्ररी आणि कुडचडेत एक सर्व सोईयुक्त लायब्ररी उभारण्यात येणार आहे.

  • प्रियोळ मतदारसंघात ‘रंगभूमी’चे (कला घर) बांधकाम सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

  • कला आणि संस्कृती खात्याअंतर्गत तालुकास्तरावर गोव्यातील स्थानिक कलाकारांची डिरेक्टरी करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

  • ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाअंतर्गत विविध राज्यांसोबत गोवा सरकार काम करणार असून यातून आपल्या गोव्याची समृद्ध कला आणि संस्कृती जगासमोर मांडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT