new excise rules Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2025: गोव्यात मद्य तस्करीला लगाम; बाटल्यांवर 'होलोग्राम'चा शिक्का हवाच! मुख्यमंत्र्यांची घोषणा

Pramod Sawant: राज्यात विकल्या जाणाऱ्या मद्याच्या बाटल्या आणि बॉक्सवर 'होलोग्राम स्टिकर्स' लावण्यात येणार आहेत

Akshata Chhatre

Hologram on liquor bottles: गोव्याच्या सीमांवरून होणारी बेकायदेशीर मद्याची तस्करी रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यात विकल्या जाणाऱ्या मद्याच्या बाटल्या आणि बॉक्सवर 'होलोग्राम स्टिकर्स' लावण्यात येणार आहेत. यामुळे, मद्याचा खरेपणा प्रमाणित होईल आणि या बरोबरच उत्पादन होणाऱ्या ठिकाणापासून ते ग्राहकांपर्यंत मद्याच्या होणाऱ्या हालचालींवर उत्पादन शुल्क विभागाला लक्ष ठेवता येईल.

गेल्या वर्षभरात राज्यात अनेक ठिकाणी बनावट मद्य पकडले गेल्यामुळे सरकारनं हे पाऊल उचललं आहे. बुधवार (दि. २६ मार्च) रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या 'होलोग्राम'मुळे मद्य उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. बनावट मद्य विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे शक्य होईल असं मुख्यमंत्री म्हणालेत.

मुख्यमंत्री सावंत यांनी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या वेळी मद्य उद्योगावरील अनुपालन भार कमी करण्याचेही संकेत दिले आहेत.

"व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी आणि अनुपालन भार आणखी कमी करण्यासाठी, मी विविध उत्पादन शुल्क तर्कसंगत करून जास्तीत जास्त पाच स्लॅबपर्यंत कमी करण्याची योजना आखली आहे," असे सावंत म्हणाले. यामुळे, मद्य उद्योगाला दिलासा मिळणार आहे.

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री डॉ. सावंत यांनी उत्पादन शुल्क विभागासाठी ३०.४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीचा उपयोग 'होलोग्राम' योजना आणि विभागाच्या इतर आधुनिकीकरणासाठी केला जाणार आहे. या निर्णयामुळे गोव्यातील मद्य व्यवसायात पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बनावट मद्याच्या विक्रीला आळा बसेल आणि ग्राहकांना सुरक्षित मद्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: थिवी रेल्वे स्थानकात 3 लाखांचा गांजा जप्त

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT