Goa Broad Band Network GBBN Project Dainik Gomantak
गोवा

‘जीबीबीएन’ प्रकल्प बंद पडण्याच्या वाटेवर!

सरकारने त्वरित लक्ष घालण्याची मागणी राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित युवकांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : अनेक वर्षांपासून राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विकसित करण्यासाठी काम करणारा गोवा ब्रॉडबँड नेटवर्क (जीबीबीएन) प्रकल्प सध्या बंद पडण्याच्या वाटेवर आहे. या प्रकल्पाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही स्थिती निर्माण झाली असून सरकारने त्वरित यात लक्ष घालण्याची मागणी राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित युवकांनी केली आहे.

जीबीबीएन प्रकल्प हा 2007 मध्ये देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते सुरू झाला होता, परंतु प्रत्यक्षात प्रकल्प 2009 मध्ये सुरू झाला. जेव्हा गोवा माहिती तंत्रज्ञान खात्याने युनायटेड टेलिकॉम्स लिमिटेड (यूटीएल) या खासगी कंपनीशी सामंजस्य करार करून प्रकल्पाचा आराखडा तयार केला, तेव्हा जीबीबीएन प्रकल्पाअंतर्गत गोव्‍यातील प्रत्येक शहरात, तसेच ग्रामीण भागांमध्ये सामान्य लोकांपर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सरकारच्या ई-सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य होते. तयार केलेल्‍या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्‍यातील ग्रामपंचायती आणि प्रमुख सरकारी कार्यालयांमध्ये इंटरनेट आणि इंट्रानेट जोडणी करायचे निश्‍चित केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उच्च दर्जाच्या अत्याधुनिक सेवा सुरू करण्याचे ठरले होते, परंतु, प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.

सर्वसामान्य लोकांपर्यंत इंटेरनेट सेवा पोहोचवण्याचे सोडून ‘यूटीएल’ने राज्य सरकार आणि गोमंतकीयांना लुबाडण्याचे काम सुरू केले. ई - सेवेच्या नावाने त्यांनी दिशाभूल करायला सुरवात केली. राज्यातील कानाकोपऱ्यात इंटेरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे सोडून त्यांनी खासगी ग्राहकांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली. कारण त्यातून त्यांना महसूल मिळत होता. एकूण मिळणाऱ्या महसुलातील 12 टक्के सरकार देत असल्याचे स्पष्टीकरण कंपनी देत आहे. मात्र, हा दिशाभूल करण्याचा प्रकार असून त्यामध्ये गोमंतकीयांची फसवणूक होत आहे.

यूटीएल कंपनीशी केलेला करार हा जुलैमध्ये संपणार असून त्यांना मुदतवाढ देता कामा नये यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्याने करार संपून सरकारने हा प्रकल्‍प आपल्या हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. जेणेकरून गोमंतकीयांना चांगली सेवा मिळणार याची खात्री केली पाहिजे, असे मत आयटी क्षेत्राशी संबंधित असलेल्या युवकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT