पणजी: गोव्यात सध्या विविध प्रकारच्या कॅन्सरचे रुग्ण आढळून येत असले तरी, त्यात स्तन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे एक चिंताजनक चित्र समोर आले आहे. राज्यात १२ ते १५ प्रकारचे कॅन्सर दिसून येत असून स्तन कॅन्सरचे वाढते प्रमाण आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय बनला आहे. यावर मात करण्यासाठी गोवा सरकारने पुढाकार घेऊन 'स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा' या प्रकल्पांतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२४ पर्यंत राबवण्यात आला. या कालावधीत गोव्यातील १ लाख ११ हजार ९८० महिलांची तपासणी करण्यात आली, ज्यात ५८ कॅन्सरच्या केसेस पॉझिटिव्ह आढळल्या.
दुसरा टप्पा एप्रिल २०२४ पासून सुरू झाला असून, आतापर्यंत या टप्प्यात ४६ हजार ७०० महिलांची तपासणी करण्यात आली आहे. यात १२ पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत.
ही आकडेवारी स्पष्ट करते की, तपासणी मोहिमेमुळे कॅन्सरचे रुग्ण लवकर ओळखले जात आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होत आहे.
डॉ. केदार नाईक यांनी सर्व महिलांना विशेष विनंती केली आहे की, ज्या कोणी २५ ते ३० वर्षांवरील आणि त्याहून अधिक वयाच्या आहेत, त्यांनी प्रत्येक महिलेने नियमितपणे ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करून घ्यावी. या तपासणीची सुविधा राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक महिलेने या सुविधांचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. नाईक यांनी केले आहे.
या संदर्भात, डॉ. रेश्मा फडते यांनी स्वतः स्तन तपासणी कशी करावी याबद्दल अधिक माहिती दिली. स्व-तपासणीमुळे महिलांना त्यांच्या स्तनात होणारे बदल लवकर ओळखता येतात, ज्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि वेळेत निदान करणे सोपे होते. स्तन कॅन्सरवर वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे, 'स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा' या उपक्रमाला प्रतिसाद देऊन प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.