Cancer Risk Eating Habits: कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या 5 जेवण करण्याच्या सवयी, तुम्हीही करत आहात का?

Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. आपण दररोज जे खातो, त्याचा आपल्या आरोग्यावर खोल परिणाम होतो. विशेषतः अन्न शिजवण्याच्या चुकीच्या पद्धती अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देतात.
Cancer Risk Eating Habits
Cancer Risk Eating HabitsDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. आपण दररोज जे खातो, त्याचा आपल्या आरोग्यावर खोल परिणाम होतो. विशेषतः अन्न शिजवण्याच्या चुकीच्या पद्धती अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देतात. यामध्ये कॅन्सरचा धोका सर्वात जास्त गंभीर मानला जातो. आपणही अशीच एखादी सवय पाळत असाल का? खाली दिलेल्या पाच मुख्य चुकीच्या स्वयंपाक पद्धती वाचा, त्या ओळखा आणि शक्य असल्यास टाळा.

तूप किंवा तेल वारंवार गरम करून वापरणे

आपण बऱ्याचदा तूप, तेल परत-परत गरम करून फोडणीसाठी वापरतो. मात्र, असं केल्याने त्यामध्ये ट्रान्स-फॅट्स तयार होतात, जे शरीरासाठी अत्यंत घातक असतात. हे ट्रान्स-फॅट्स शरीरात साचून कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात. दरवेळी अन्न शिजवताना ताजं तेल किंवा मर्यादित गरम केलेलं तेल वापरा.

Cancer Risk Eating Habits
Goa Crime: उत्तर गोव्यात 135 अट्टल गुन्हेगार! पडताळणी मोहिमेत 11 सराईतांचा यादीत समावेश; 1648 व्यक्तींना अटक

तळलेले, भाजलेले पदार्थ

तळलेले किंवा भाजलेले अन्न चविष्ट वाटते, मात्र ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. जळलेल्या भागांमध्ये अ‍ॅक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं, ज्याचा दीर्घकाळ वापर केल्यास कॅन्सरची शक्यता वाढते.

प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करणे

अनेकजण मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करतात. ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. गरम झाल्यास प्लास्टिकमधून बीपीए (Bisphenol-A) किंवा इतर विषारी रसायनं अन्नात मिसळतात, जे हार्मोनल बदल घडवून आणून कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. मायक्रोवेव्हसाठी काच किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करा.

Cancer Risk Eating Habits
Goa Drugs Case: शिवोलीत ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश, 22 लाखांचे ड्रग्ज जप्त; केरळच्या तरुणाला अटक

ग्रिलिंग, कोळशावर शिजवलेले पदार्थ किंवा जळती फोडणी दिलेले पदार्थ यामध्ये PAHs (Polycyclic Aromatic Hydrocarbons) तयार होतात, जे फुफ्फुसांच्या आणि पचनसंस्थेच्या कॅन्सरसाठी जबाबदार असू शकतात.

रात्रीचे अन्न परत-परत गरम करणे

रात्रीचं उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी वापरणं सामान्य बाब आहे, पण सतत गरम करताना अन्नातील पोषणमूल्य नष्ट होतं आणि काही वेळेस नवीन घातक रसायनं तयार होतात. अन्न ताजं खाण्याचा प्रयत्न करा, आणि गरज असेल तर केवळ एकदाच गरम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com