गांजे- उसगाव येथे गेल्या रविवारी युवकांचा नदीत बुडून मृत्यू. दोघे युवक भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत प्रशिक्षण घेत होते. वाचलेल्या ४ युवकांनी ६ जणांचा गट आंघोळीसाठी गेल्याची जबानी पोलिसांना तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. ४-५ दिवस पोलिसांना गुंगारा दिलेल्या त्या ४ युवकांनी प्रशिक्षकाला व अन्य दोन अधिकाऱ्यांना कारवाई पासून सुटका करण्यासाठी खोटी जबानी दिल्याचे स्पष्ट. मृत्यू झालेल्या लवप्रीत सिंग यांच्या मोबाईलने प्रशिक्षक युवकांच्या बरोबर गेल्याचा दिला पुरावा.
गोव्याची जीवनवाहिनी मानली जाणारी मांडवी नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. राजधानीतील मांडवी नदीच्या प्रदूषणाचे मुख्य स्रोत शहरी सांडपाणी, कॅसिनो आणि नदीकिनारी असलेल्या रेस्टॉरंट्समधून सोडले जाणारे सांडपाणी हेच असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
मी गोवेकरांना आश्वस्त करतो की जीएमसीचे डॉ.रुद्रेश कुट्टीकरांचे निलंबन होणार नाही. मी याबाबत आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सेवेतील डॉक्टरांची केली प्रशंसा.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गोव्यात कोविड-१९ चा एक नवीन रुग्ण आढळला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ९ आहे.
मालपण-सत्तरी, येथील रोहिदास गावंकर यांया घराजवळ, असलेल्या खड्ड्यात म्हैस पडण्याची घटना घडली, यावेळी अग्निशमन दलातर्फे जेसिपीचा सहायाने तिला बाहेर काढण्यात आले. मात्र तिचे प्राण वाचू शकले नाही
तेलंगणा अँटी-नार्कोटिक्स ब्युरोने एका आठवड्यात २.१ कोटी रुपयांच्या ड्रग्ज मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली म्हापसा येथील एका मोबाईल दुकानाच्या मालकाला अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्या अपार्टमेंटमधून ही बेकायदेशीर रक्कम जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
गोवा फॉरवर्ड प्रमुख विजयी सरदेसाई यांनी गोगोल येथील संकट हनुमान भजन मंदिराच्या बांधकामासाठी १० लाखांची देणगी दिली. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मी आमदार निधीचा काही भाग खर्च करेन असे विजयी सरदेसाई यांनी सांगितले.
वर्ल्ड ओशन दिनानिमित्त आश्वे मांद्रे येथील आजोरा रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी आश्वे समुद्र किनारा स्वच्छ करण्याचा उपक्रम राबवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.