St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa School Violence: सांतइस्तेव येथील सेंट तेरेझा हायस्‍कूलमध्ये एका शिक्षिकेने १० अल्पवयीन विद्यार्थ्यांना काठीने अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांतइस्तेव येथील सेंट तेरेझा हायस्‍कूलमध्ये एका शिक्षिकेने १० अल्पवयीन विद्यार्थ्यांना काठीने अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी एका मुलाच्या आईने जुने गोवे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून क्लान्सी केजेटन डिसिल्वा (रा. नान्सेभाट बिठ्ठोण) या शिक्षिकेला अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती.

पालकांच्या तक्रारीवरून क्लान्सीविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि गोवा बाल कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही घटना ३ जुलै रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्यासुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. यामध्ये थप्पड मारणे, धक्का देणे, तसेच अपमानास्पद शब्द वापरण्याचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांपैकी काहीजणांनी याची माहिती पालकांना देताच पालकांनी जखमी विद्यार्थ्यांसह जुने गोवे पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.

Crime News
Goa Crime: कुडचडे बलात्कार प्रकरण: जीम ट्रेनर सरवर खानला अटकपूर्व जामीन! अटक केल्‍यास 50 हजारांच्‍या जामिनावर सोडण्‍याचा आदेश

पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी आढळल्याने त्यांना उपचारासाठी गोमेकॉत पाठवण्यात आले. आणखी ३-४ विद्यार्थ्यांनाही जबर मारहाण झाल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीत आढळले आहे. त्‍याची माहिती पोलिस घेत आहेत. संबंधित विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली असून, बाल कल्याण समितीकडून प्रकरणावर लक्ष ठेवण्यात येत आहे. शाळा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Crime News
Goa Crime: 'सोनसाखळी चोर' इराणी गँग गोव्यात पुन्हा सक्रिय! मायणा-कुडतरी चोरी प्रकरणातील एकाला पुण्यातून अटक

दाखल गुन्हे आणि कायदेशीर कलमे:

l कलम ११८(१), भारतीय न्यायसंहिता

सार्वजनिक शांततेस किंवा सामाजिक सुसंवादास बाधा निर्माण करणारे वर्तन. शाळा हे एक सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण असले पाहिजे, याला धक्का पोहोचवणाऱ्या कृतीसाठी हे कलम लागू होते.

l कलम ३५२, भारतीय न्यायसंहिता

कोणत्याही वैध कारणाशिवाय शारीरिक मारहाण केल्यास हा गुन्हा ठरतो.

l कलम ८(२), गोवा बालक कायदा, २००३

बालकाला कोणताही शारीरिक किंवा मानसिक त्रास झाल्यास, विशेषत: शाळा किंवा देखरेखीच्या ठिकाणी, संबंधित प्रौढाविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद असलेले कलम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com