FIR Dainik Gomantak
गोवा

अंगठ्यावर शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू, पुन्हा गाजले कॅश फॉर जॉब प्रकरण; गोव्यातील ठळक बातम्या

27 November 2024 Marathi News: गोव्यातील महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये जाणून घ्या

Akshata Chhatre

सामाजिक कार्यकर्ते फर्नांडिस यांना मारहाण; हणजूण ग्रामसभा तापणार!

गेल्या रविवारी झालेल्या हणजूण-कायसूव पंचायतीच्या ग्रामसभेत ध्वनिप्रदूषणाला विरोध दर्शविणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. इनासियो फर्नांडिस यांना पाचजणांनी पोलिसांसमोरच मारहाण केली होती. या प्रकरणातील संशयितांना पोलिस कधी अटक करणार, असे म्हणत आज बुधवारी समविचारी तथा समाजिक कार्यकर्त्यांच्या गटाने हणजूण पोलिसांना जाब विचारला. संशयितांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

अंगठ्यावर शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू; ESI डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

२७ गणेमरड-शेल्डे (केपे) येथील सुनयना देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाला ईएसआय इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्वजीत फळदेसाई यांना दोषी धरून मडगाव पोलिसांनी त्यांच्या विरोधात भादंसंच्या ३०४ (अ) (हलगर्जीपणामुळे मृत्यू) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. ही दुर्घटना १५ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली होती. डाव्या हाताच्या अंगठ्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यासाठी या महिलेला मडगावच्या ईएसआय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, इस्पितळात ही शस्त्रक्रिया केली जात असताना ती मृत पावली

मंगळसूत्र चोरी प्रकरणातील आरोपीला 4 दिवसांची पोलिस कोठडी!

माशेल परिसरात काही दिवसांपूर्वी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढलेला दुचाकीस्वार राजेश गोपीनाथ मापारी (पोंबुर्फा) याला म्हार्दोळ पोलिसांकडून अटक. आरोपीला फोंडा न्यायालयात हजर केला असता 4 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

खनिज वाहतुकीसंदर्भात 'सुवर्णमध्य' काढा!

खनिज वाहतुकीसंदर्भात 'सुवर्णमध्य' काढण्याची, डिचोली ट्रकमालक संघटनेची मागणी. संघटनेकडून डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आठ दिवसांपासून खनिज वाहतूक बंद असल्याने ट्रकमालक अडचणीत.

पोप फ्रान्सिसना अधिकृत निमंत्रण पाठवा; कार्डिनल फिलिप नेरी फेर्रावनी व्यक्त केली इच्छा

कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी पोप फ्रान्सिस यांना अधिकृत निमंत्रण पाठवण्याची आशा व्यक्त केली. गोव्याच्या राज्यपालांनी पोप फ्रन्सिस यांच्या भारत भेटीसाठी केंद्र सरकारकडून अधिकृत लेखी निमंत्रण मिळवण्यात मोलाची भूमिका बजावावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

फोंड्यातील डॉ. जयंत कामत यांचे निधन

फोंडा येथील प्रख्यात स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. जयंत कामत यांचे बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) पहाटे निधन झाले.

कॅश फॉर जॉब प्रकरणात दीपश्रीला पुन्हा पोलीस कोठडी

दीपश्री सावंत-गावासला सरकारी नोकरीचे अमिश दाखवून पैसे उकळल्या प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली असून, तिला फोंडा पोलिसांनी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले आहे.

सेंट झेवियर शव प्रदर्शन सोहळ्यासाठी आणणार ३० नवीन बसेस: माविन गुदिन्हो

केटीसीएलने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्यासाठी ३० नवीन बसेस मागवल्या आहेत. यात्रेकरूंसाठी पणजी,मडगाव, वास्को आणि जुने गोवा येथून सुरळीत बस सेवा मिळावी म्हणून काही बसेस आधीपासून तैनाद केल्या आहेत आणि राहिलेल्या बसेस लवकरच येतील अशी माहिती परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

सीबीडीटीच्या आरोपींना सशर्त जमीन मंजूर

पणजी सीबीआय न्यायालयाने सीबीडीटीच्या आरोपी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. अतुल वाणी आणि पंकज कुमार या दोन्ही आरोपींना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT