Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा वन महोत्सवाला स्थानिक आणि पर्यटकांकडून प्रचंड प्रतिसाद, वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Breaking News Marathi: जाणून घ्या गोव्यातील राजकरण, क्रीडा,मनोरंजन आणि इतर घडामोडी

Sameer Amunekar

गोवा वन महोत्सवाला स्थानिक आणि पर्यटकांकडून प्रचंड प्रतिसाद

गोवा वन महोत्सवाला स्थानिक आणि पर्यटकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः तरुण पिढी आणि परदेशी पर्यटकांनी गोव्याच्या पारंपरिक औषधी वनस्पती, हस्तकला आणि लोकसंस्कृती जाणून घेण्यात मोठा रस दाखवला.

कांदोळीत टॅक्सी चालक आणि बेकायदेशीर भाड्याच्या वाहनाच्या मालकात

कांदोळीत टॅक्सी चालक आणि बेकायदेशीर भाड्याच्या वाहनाच्या मालकात वाद झाल्याचं समोर आलं आहे.

महादेव भाट वळवई येथील वीज ट्रान्सफॉर्मर जळून खाक

महादेव भाट वळवई येथील वीज ट्रान्सफॉर्मर जळून खाक. शालेय विद्यार्थी फुटबॉल खेळताना फुटबॉल वीज वाहिनीला लागल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज खात्याचे सुमारे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फोन्डचेभाट परिसरातील वीज पुरवठा खंडित. संध्याकाळ पर्यंत होणार सुरळीत.

बोलेपांड, फातोर्डा येथे आसामातील एकाचा मृत्यू

बोलेपांड, फातोर्डा येथे मूळ आसाममधील एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. सत्या कहर असे मयताचे नाव असून तो आर्ले येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. अनैसर्गिक मृत्यू म्हणून फातोर्डा पोलिसांनी ही घटना नोंदवून घेतली आहे. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. मयताच्या आसाम येथील कुटुंबीयांना या घटनेविषयी पोलिसांनी माहिती कळविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्या हा आपल्या अन्य सहकाऱ्याबरोबर राहत होता. शुक्रवारी रात्री जेवण घेऊन तो झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने मागाहून त्याला इस्पितळात नेले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर पोलिसांनी इस्पितळात जाउन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुखदा प्रभुदेसाई पुढील तपास करीत आहेत.

'फॉर्म 7' भरण्याच्या नियमांचे नावेली मतदारसंघात उल्लंघन

मतदारयादी पुनर्पडताळणी (एसआयआर) अंतर्गत एकाच व्यक्तीला ‘फॉर्म ७ ’ हा दहापेक्षा जास्त वेळा अर्ज करता येत नाही, परंतु नावेली मतदारसंघात आमदाराच्या कार्यकर्त्याने एकाच दिवशी ५० च्यावर अर्ज दाखल केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) आणि बीएलओंची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळला

वास्को येथील आयओसी रेल्वे रुळावर एका महिलेचा डोके कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्या महिलेचे शरीर एका बाजूला तर डोके रेल्वे रुळाच्या पटरी जवळ आढळले. कदाचित त्या महिलेला वॅगन रेल्वेची धडक बसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वास्को पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला आहे. त्या मृत महिलेचे नाव समजले नसून तिच्या हातावर पुष्पा के सिंग असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोवा प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी अर्चित नाईक

गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अर्चित नाईक यांनी बाजी मारली. अध्यक्षपदाच्या रिंगणात तीन उमेदवार होते. त्यात नाईक यांनी सर्वाधिक ३,९३० मते मिळवित अध्यक्षपद पटकावले.

सरचिटणीसपदी नौशाद चौधरी यांची वर्णी लागली. त्यांनी १ हजार २६१ मते मिळविली. त्यांच्या विरोधात पाच उमेदवार होते.

Vasco: वास्कोत विनापरवाना दुकानाला ठोकले टाळे वास्को

वाडे येथे परवान्याविना व्यवसाय करणाऱ्या एका दुकानाला मुरगाव पालिकेने शुक्रवारी टाळे ठोकले. मालकाने सर्व परवाने सादर केल्यावरच पुन्हा व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेने विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई ची मोहीम काही महिन्यांपासून हाती घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT