Blast  Dainik Gomantak
गोवा

Kerala Serial Blast Case: केरळ मधील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात अलर्ट; काणकोणात पोलीस फौजफाटा तैनात

काणकोण येथील ज्यू नागरिकांच्या प्रार्थना स्थळावरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

Ganeshprasad Gogate

Kerala Serial Blast Case केरळ एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी सकाळी भीषण स्फोट झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यावर गोव्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेष म्हणजे काणकोण येथील ज्यू नागरिकांच्या प्रार्थना स्थळावरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

या प्रार्थना स्थळाबाहेर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. शिवाय अन्य सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे का या संबंधी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान केरळ एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी सकाळी भीषण स्फोट झाला असून या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त समजतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेसाठी अनेक लोक जमले असताना हा स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी नऊच्या सुमारास झाला.

पुढच्या काही मिनिटांत एकामागून एक स्फोट झाले. या घटनेच्या तपासासाठी एनआयए आणि एनएसजीची टीम केरळला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT