Bodgeshwar Jatra Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Jatra: गोबी मंचुरियन स्टॉल्सवर पालिकेची कारवाई, शिजवलेले अन्न फेकले कचऱ्यात; उपस्थितांच्या संतप्त प्रतिक्रिया

Bodgeshwar Jatra: नासाडी करून काय मिळवलं? ते पोटापाण्यासाठीच व्यवसाय करतात- स्थानिक

Ganeshprasad Gogate

Bodgeshwar Jatra: बोडगेश्वर जत्रोत्सवाच्या फेरीतल्या गोबी मंचुरियन स्टॉल्सवर म्हापसा पालिकेची कारवाई केल्याची माहिती समोर येतेय.

रविवारी सायंकाळी पालिकेने अंदाजे 10 स्टॉल बंद पाडत पालिका कर्मचाऱ्यांनी स्टॉलाधारकांचे साहित्य देखील जप्त केल्याचे समजतेय.

पालिकेने जत्रोत्सवात गोबी मंचुरियन स्टॉल्स उभारण्यास बंदी असेल असा ठराव आपल्या पालिका मंडळाच्या विशेष बैठकीत घेतला होता. असे असूनही स्टॉल लावले गेले याबाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय.

गोमंतकीयांचा राखणदार समाजाल्या जाणाऱ्या देव बोडगेश्वराच्या 89 व्या जत्रोत्सवास बुधवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.

हा जत्रोत्सव 4 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी चालणार असून दररोज भाविकांची गर्दी याठिकाणी पाहायला मिळतेय.

या जत्रोत्सवाआधी म्हापसा पालिका प्रशासनाने जत्रोत्सवासंबंधी विशेष बैठक घेतली असून या बैठकीत गोबी मंचुरियन स्टॉल्स उभारण्यास बंदी असेल असा ठराव घेण्यात आला होता.

तसेच या जत्रोत्सवात स्टॉल धारकांनी अशाप्रकारचे स्टॉल लावू नये असे निर्बंध घालण्यात आले होते. मात्र असे असून ही गोबी मंचुरियनचे अंदाजे 10 स्टॉल्स लावण्यात आले होते.

या सर्व स्टॉल्स वर पालिकेने कारवाई करत स्टॉल धारकांचे शेगडी, गॅस सिलिंडर, तवा, कढई यासहित सर्व साहित्य जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हा अन्नाचा अपमान:-

दरम्यान पालिकेने कारवाई केली त्यावेळी तयार केलेल्या गोबी मंच्युरियनच्या भरलेल्या प्लेट, कढई अक्षरशः कचऱ्यात फेकून दिल्या.

पालिका कर्मचाऱ्यांच्या या कृतीवर उपस्थितांनी नाराजी व्यक्त केलीय. 'हा सरळ सरळ अन्नाचा अपमान असून एखाद्या गरिबाला अथवा भुकेलेल्या व्यक्तीला जर दिलं असतं तर किमान ते अन्न सार्थकी लागलं असतं अशी प्रतिक्रिया यावेळी उमटली.

ही कारवाई आधीच का केली नाही? जत्रोत्सवाच्या 4 थ्या दिवशी पालिका जागी झाली का? स्टॉलधारक आपल्या पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतात. त्यांच्यापर्यंत ठरावाची माहिती पोहोचवली का असाही प्रश्न यावेळी जत्रोत्सवात आलेल्या काहीतरी उपस्थित केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT